CoronaVirus News : स्पेनमध्ये मे पर्यंत राष्ट्रीय आणीबाणी; श्रीलंकेत प्रवासी रेल्वे सेवा बंद! By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 3:22 PM1 / 16कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेनने आता रात्रीच्यावेळी कर्फ्यू लागू केला आहे. तसेच, देशात आणीबाणी घोषित केली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सान्चेझ यांनी सांगितले की, सकाळी ११ वाजता ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू राहील. म्हणजेच या कालावधीत लोकांना घराबाहेर पडायला बंदी असेल. हे निर्बंध रविवारपासून अंमलात आले आहेत. दुसरीकडे, कोरोना प्रकरणात होणारी वाढ पाहता श्रीलंकेने सर्वाधिक गर्दी असलेल्या १६ प्रवासी रेल्वे गाड्याही थांबविल्या आहेत.2 / 16स्पेनमध्ये आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासन विविध क्षेत्रातील हालचालींवर निर्बंध घालू शकते, असे पंतप्रधान पेद्रो सान्चेझ यांनी सांगितले. तसेच, संसदेला नवीन नियमांची मुदत सहा महिन्यांपर्यंत वाढविण्यास सांगणार, जे सध्या १५ दिवस आहेत. या वर्षाच्या सुरूवातीच्या काळात संसर्गाच्या पहिल्या लाटेदरम्यान स्पेनची परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती. त्यामुळे कडक लॉकडाउन लागू केला होता.3 / 16इतर युरोपियन प्रदेशांप्रमाणेच स्पेन सुद्धा संक्रमणाच्या दुसर्या लाटेत सापडला आहे. इटलीमध्येही रविवारपासून नवीन निर्बंध जाहीर करण्यात आले. सरकारने सांगितले की प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने देशाच्या आरोग्य सेवांवरचा ताण वाढला आहे. दरम्यान, फ्रान्समध्ये विक्रमी प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. फ्रान्समध्ये रविवारी २४ तासांत एकूण ५२०१० जणांना कोरोनाची लागण झाली.4 / 16स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सान्चेझ म्हणाले की, रात्रीच्या कर्फ्यू दरम्यान वेगवेगळ्या प्रदेशांना त्यांच्या वेळेत काही बदल करायचे असतील तर ते एका तासासाठी पुढे किंवा मागे करू शकतात. प्रादेशिक नेते एका जिल्ह्यापासून दुसर्या जिल्ह्यात जाणाऱ्या वाहतुकीवरील निर्बंधाचा निर्णय घेतील. केवळ काम किंवा आरोग्याशी संबंधित गरजा मिळू शकतील. आम्ही अत्यंत कठीण काळातून जात आहोत. गेल्या ५० वर्षातील ही सर्वात गंभीर परिस्थिती आहे.5 / 16कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पेनच्या अनेक भागांमध्ये कठोर निर्बंध घालण्याची मागणी केली जात होती. आता नवीन निर्बंध कॅनरी बेट सोडून इतर सर्व भागात लागू असतील. एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात साथीच्या पहिल्या लाटेच्यावेळीही अशीच आणीबाणी लागू करण्यात आली होती. साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून स्पेनमध्ये संसर्गाचे प्रमाण १० लाखांवर गेले आहे आणि जवळपास ३५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.6 / 16दुसरीकडे, कोरोना संसर्गाचा फैलाव पाहता श्रीलंकेची मुख्य मच्छी मार्केट गुरुवारी बंद करण्यात आली. तसेच, बर्याच भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यानंतर रविवारी सरकारने १६ प्रवासी रेल्वे गाड्या बंद करण्याची घोषणाही केली आहे. 7 / 16कोलंबो आणि राजधानीबाहेरील काही भागात सरकारने कर्फ्यू लागू केला आहे. दरम्यान, या महिन्यात पश्चिम प्रांतातील किमान सहा खेड्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याची नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे.8 / 16श्रीलंकेतील कोलंबो देखील पश्चिम प्रांतात येतो. ४९ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी देशातील प्रमुख मच्छी मार्केट तात्पुरते बंद केले आहे. कोलंबोच्या हद्दीत असलेल्या बाजारामध्ये शेकडो अन्य व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येते.9 / 16दुसरीकडे, इटलीमध्ये सोमवारपासून सिनेमा, स्विमिंग पूल, थिएटर आणि जिम बंद केली जाणार आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बार, रेस्टॉरंट्स आणि कॅफेच्या सेवा बंद कराव्या लागतील. मात्र, अधिक दुकाने आणि व्यवहार चालू राहतील. 10 / 16नवीन निर्बंध इटलीचे पंतप्रधान ज्युसेप कोंटे आणि प्रांतीय नेत्यांच्या परस्पर सहमतींनी लागू केले आहेत. पंतप्रधान ज्युसेप कोंटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत म्हणाले, 'या महिन्यात आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागेल. मात्र या निर्बंधांमुळे आम्ही डिसेंबरमध्ये पुन्हा श्वास घेण्याच्या स्थितीत असू'.11 / 16पहिल्या लाटेमुळे मार्च आणि एप्रिलमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनसारखे पुन्हा राष्ट्रीय लॉकडाऊन लागू करण्याची इच्छा नाही, कारण त्यावेळी बरेच आर्थिक नुकसान झाले. नव्या निर्बंधांतर्गत बहुतांश शाळांमध्ये ऑनलाईन शिकवले जाईल, असे इटलीचे पंतप्रधान ज्युसेप कोंटे यांनी सांगितले. रविवारी इटलीमध्ये एका दिवसात २१२०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली. तर १२८ लोकांचा मृत्यू झाला.12 / 16गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीमुळे जवळजवळ जग थांबवले. सुमारे सात महिन्यांनंतर, पुन्हा सामान्य परिस्थितीत येत असताना आता परत कोरोनाच्या दुसर्या लाटेची भीती वाढली आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या संसर्गाच्या नवीन घटनांची संख्या वाढली आहे. युरोपमध्ये संक्रमणाची नवीन प्रकरणे वाढली आहेत, ज्यामुळे नवीन निर्बंध जारी केले गेले आहेत.13 / 16बेल्जियममध्ये कोरोनाच्या संसर्गाची प्रकरणे लवकरच चिंताजनक परिस्थितीत पोहोचू शकतात, असा इशारा बेल्जियमच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. तसेच, सोमवारपासून बेल्जियममध्ये नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्व रेस्टॉरंट्स चार आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. 14 / 16चेक रिपब्लिकमध्ये सुद्धा परिस्थिती सर्वात चिंताजनक आहे. संपूर्ण प्रदेशात कोरोना संसर्गाच्या नवीन घटनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. संपूर्ण लॉकडाऊनचा विचार संपूर्ण देशात केला जात आहे. आयर्लंडमध्ये कोरोनोच्या दृष्टीने बुधवारी मध्यरात्रीपासून सहा आठवड्यांसाठी कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.15 / 16पोलंडने मार्च-एप्रिलमध्ये कोरोना साथीच्या रोगावर उत्तम प्रकारे नियंत्रण मिळविले. याबाबत पोलंडचे कौतुकही झाले. मात्र, गेल्या आठवड्यात पोलंडमध्ये दररोज दहा हजार कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याचे दिसून आले.16 / 16कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जर्मनीतील सरकारने सार्वजनिक इमारतींमध्ये वेंटिलेशन चांगले करण्यासाठी ४५२ मिलियन पाउंडची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे आणि शनिवारी एका दिवसात येथे विक्रमी रुग्णांची नोंद झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications