CoronaVirus vaccine Marathi News Coronavirus vaccine phase 3 clinical trials in Pakistan
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार! By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 10:56 PM1 / 11पाकिस्तान कोरोना व्हायरस लशीच्या शेवटच्या टप्प्यातील परीक्षण करण्यासाठी सज्ज झाला आहे. द एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ पाकिस्तानकडून (DRAP) तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी मंजूरी मिळाल्याचे पाकिस्तानच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थने (NIH) म्हटले आहे.2 / 11पाकिस्तान चिनी कंपनी कॅन्सिनो आणि बीजिंग इंस्टीट्यूट ऑफ बायोटेक्नोलॉजीने तयार केलेल्या लशीचे परीक्षण करणार आहे. 3 / 11पाकिस्तानच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थने दिलेल्या माहितीनुसार, कुठल्याही लशीचे पाकिस्तानात तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 4 / 11नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की कॅन्सिनो अनेक देशांत तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण करत आहे आणि पाकिस्तानदेखील याचा भाग आहे. 5 / 11कॅन्सिनो, चीन, रशिया, चिली आणि अर्जेंटीनामध्येदेखील आपल्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण करत आहे. 6 / 11NIH चे एग्झिक्यूटिव्ह डायरेक्टर मेजर जनरल आमिर इकरम यांना पाकिस्तानात मल्टी सेंटर क्लिनिकल ट्रायलचे मुख्य अन्वेषक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 7 / 11पाकिस्तानात नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH), कॅन्सिनो आणि एजेएम फार्मा एकत्रितपणेह हे परीक्षण पूर्ण करतील.8 / 11पाकिस्तानातील आगा खान मेडिकल युनिव्हर्सिटी कराची, इन्डस हॉस्पिटल कराची, शौकत खानुम मेमोरियल हॉस्पिटल लाहोर आणि शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटल इस्लामाबादमध्ये या लशीचे परीक्षण होईल. 9 / 11आलेल्या वृत्तानुसार, तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षणानंतर, पाकिस्तानातही या लशीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा होईल. 10 / 11पाकिस्तानात आतापर्यंत तब्बल 2,89,215 जणांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.11 / 11पाकिस्तानात आतापर्यंत तब्बल 2,89,215 जणांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications