Coronavirus: Vaccine may never find on Corona Big claim from a leading research scientist pnm
Coronavirus: कोरोना व्हायरससमोर संशोधकांनी हात टेकले?; प्रमुख वैज्ञानिकाने केला ‘हा’ मोठा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 8:50 PM1 / 12सध्या जगातील अनेक देशांवर कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. जगातील १७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १ लाखांहून अधिक जणांचा जीव गेला आहे. 2 / 12कोरोना रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. लोकांची गर्दी होऊ नये, सोशल डिस्टेंसिगचं पालन करावं अशाप्रकारे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. 3 / 12मग हे लॉकडाऊन किती काळ चालणार? लॉकडाऊनमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अनेकांना रोजगार जाण्याची भीती सतावत आहे. उद्योजकांच्या संपत्तीत कोट्यवधीने घट होत चालली आहे. हे असचं सुरु राहिले तर अनेक लोकांवर गरिबीचं सावट येण्याची भीती आहे.4 / 12कोरोना व्हायरसवर लस शोधण्याचं काम अनेक देश करत आहे. सध्या इतर आजारांची औषध संयुक्तपणे वापरून कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे. पण अशातच ऑस्टेलिन वृत्तपत्रात आलेल्या बातमीने भीती निर्माण झाली आहे.5 / 12गेल्या 40 वर्षात दरवर्षी सरासरी 8 लाख लोक एचआयव्हीने मरण पावत आहेत. अद्यापपर्यंत एचआयव्हीची कोणतीही लस आढळली नाही. याचा संदर्भ घेत कोरोना व्हायरस लस शोधत असलेल्या टीमचे नेतृत्व करणारे प्रमुख वैज्ञानिक जेन हॅल्टन यांनी म्हटले आहे की कदाचित कोरोना लस कधीच सापडणार नाही. कारण विज्ञानात काहीही निश्चित नाही असं त्यांनी सांगितले. 6 / 12जेन हॅल्टन कोरोना लस (Coalition for Epidemic Preparedness Innovations)) च्या शोधासाठी कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय टीमचे नेतृत्व करीत आहेत. या गटाला बिल गेट्सकडून निधी मिळाला आहे. जेन ऑस्ट्रेलियाच्या सर्वात अनुभवी साथीच्या रोगाचा तज्ञ म्हणून देखील ओळखला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळावरही त्यांनी काम केले आहे आणि जागतिक आरोग्य संसदेचा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.7 / 12कोरोनाविरूद्ध सर्व देश एका लसीच्या आशेवर बसू नये म्हणून जेन हॅल्टनने हा इशारा दिला आहे. त्याऐवजी कोरोनाला पराभूत करण्यासाठी प्लॅन बी’वरही काम केले पाहिजे असं ते म्हणाले.8 / 12कोरोना विषाणू जगभर वेगाने पसरत आहे. १७ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. एक लाखाहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तथापि, कोरोना लस शोधण्यासाठी अनेक देशांमध्ये चाचण्या घेतल्या जात आहेत.9 / 12ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राशी बोलताना वैज्ञानिक जेन हॅल्टन म्हणाले की, आरोग्य अधिकाऱ्यांनी प्लॅन बीवर वेगवान काम करण्याची गरज आहे. कारण कदाचित आम्ही कोरोनावर लस शोधू शकत नाही. पण जगातील बरेच आरोग्य तज्ञ अशी आशा बाळगतात की २०२१ पर्यंत जगाला कोरोना लस तयार करण्यात यश मिळू शकेल.10 / 12परंतु इतक्या कमी कालावधीत कोरोनावर लस शोधून काढणं अविश्वसनीय आहे. अशाप्रकारे खोट्या आशा दाखवल्या जात आहेत. कोविड -१९ शिवाय अन्य कोरोना व्हायरसची लस अद्याप बनली नाही असं जेन हाल्टन यांनी सांगितले.11 / 12त्याच वेळी २००८ मध्ये एचआयव्हीमुळे जगात ७ लाखांहून अधिक लोकांचा जीव गेला होता. गेल्या ४० वर्षात, ३ कोटी २० लाख लोकांचा एचआयव्हीने जीव गेला आहे. परंतु आजपर्यंत शास्त्रज्ञांना एचआयव्ही लस मिळालेली नाही.12 / 12अमेरिका, चीनसह अनेक देशांमध्ये मानवांवर कोरोना लसीची चाचणी सुरू आहे. परंतु जेन हॅल्टनचा इशारा या अपेक्षा कमी करण्याचा आहे. कारण लोकांनी पर्यायी योजनांवर काम करण्यास सुरुवात करावी असं ते सतर्क करत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications