coronavirus: The virus will kill the virus! coronavirus will killed SARS-Cov-2
coronavirus: विषाणूच विषाणूला मारणार! कोरोनाच कोविड-१९ ला मारण्यासाठी बळ देणार, समोर आली दिलासा देणारी माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 10:51 AM1 / 12सध्या संपूर्ण जगातील मानवजातीसाठी गंभीर संकट ठरलेल्या कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठीचे उपाय आणि इलाजाबाबत अनेक देशात संशोधन सुरू आहे. 2 / 12दरम्यान, सिंगापूरमध्ये झालेल्या एका नव्या संशोधनामुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठीच्या उपचारपद्धतीच्या माध्यमातून मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे. 3 / 12सिंगापूरमध्ये झालेल्या या संशोधनानुसार ज्या लोकांना यापूर्वी कुठल्याही अन्य कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला असेल. त्यांच्यामध्ये कोविड-१९ चा फैलाव करणाऱ्या सार्स-सीओव्ही-२ विरोधात लढण्याची क्षमता आधीपासून विकसित झालेली असू शकते. 4 / 12कोरोना विषाणू हे बऱ्याच काळापासून मानवी शरीरात वावरत आलेले आहेत. त्यामुळे त्यांची मदत घेऊन कोविड-१९ विरोधात लढण्यासाठी क्षमता विकसित करता येऊ शकते. 5 / 12कोविड-१९ आजार ज्यामुळे होतो त्या सार्स-सीओव्ही-२ चा संसर्ग आधी झाला नसेल त्यांच्यामध्येसुद्धा कोरोनाविरोधात लढण्याची क्षमता विकसित झालेली असू शकते, असे सिंगापूरमधील संशोधनातून समोर आले आहे. 6 / 12 कोरोना विषाणू हा विषाणूंचा एक समूह आहे. तर कोविड-१९ हा विशेष प्रकारच्या सार्स-सीओव्ही-२ विषाणूमुळे होतो. नेचर या मासिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ज्या व्यक्तींमध्ये पूर्वीच कुठल्याही अन्य कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला असेल तर त्यांच्यामध्ये सार्स-सीओव्ही-२ लढण्याची क्षमता असू शकते. 7 / 12यापूर्वी २००३ मध्ये कोरोना विषाणूमुळे सार्सची साथ पसरली होती. मात्र त्यावेळी भारतात सार्सचा फार फैलाव झाला नव्हता. मात्र जगातील इतर भागात जगभरात फैलाव झाला होता. 8 / 12काही लोकांच्या शरीरात टी-सेल विकसित झालेले असतात. टी-सेल पेशींच्या आत जाऊन संसर्गाला मारण्याचे काम या सेल करतात. विषाणूमध्ये एक खास स्ट्रक्चरल प्रोटीन असते. जेव्हा विषाणू शरीरातील कुठल्याही सेलला बाधित करतो. तेव्हा नॉन-स्ट्रक्चरल व्हायरल प्रोटीन तयार होते. टी-सेल या दोघांनाही ओळखता येऊ शकते. 9 / 12२००३ मध्ये झालेल्या सार्सच्या फैलावानंतर १७ वर्षांनंतरही काही लोकांमध्ये टी-सेल शरीरात उपस्थित होत्या. तसेच या सेल सार्स-सीओव्ही-२ च्या संसर्गालाही ओळखत होत्या. इतकेच नव्हे तर ज्या रुग्णांना सार्स किंवा कोविड-१९ चा संसर्ग झालेला नसेल, अशांमध्येदेखील टी-सेल दिसून आल्या आहेत. तसेच कोविड-१९ मधून सावरलेल्या रुग्णांमध्ये अशा टी-सेल होत्या त्या विषाणूच्या स्ट्रक्चरल प्रोटिनला एनएसपीपेक्षा चांगल्या पद्धतीने ओळखत होते. 10 / 12संशोधनातून समोर आलेली विशेष बाब म्हणजे ज्या लोकांना आधीच कुठलाही संसर्ग झालेला नाही त्यांच्यामध्येही टी-सेल दिसून आले आहेत तसेच ते सार्स-सीओव्ही-२ ला ओळखत होते. तसेच जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या कोरोना विषाणूमध्ये असलेल्या एनएसपीच्या सीक्वेंसला हे टी-सेल ओळखत होते. त्यामुळे मोठ्या संख्येमध्ये लोकांमध्ये कोरोना विषाणूमध्ये लढण्याची क्षमता विकसित झाली आहे. 11 / 12मानवामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्वीपासून होत आला आहे. मात्र सार्स-कोव्ह-२ विषाणूप्रमाणे कोरोनाचे सर्व विषाणू हे जीवघेणे नसतात. मात्र या कोरोना विषाणूंमुळे कोरोनाला ओळखणारे टी-सेल उपस्थित असतात. 12 / 12 काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोनावरील लसीची माणसांवर करण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली होती. ज्या लोकांमध्ये चाचणी घेण्यात आली त्यामुळे कोरोनाच्या संसर्गामुळे केवळ अँटीबॉडीच नाही तर टी-सेल सुद्धा विकसित झाल्या होत्या. साधारणपणे अँटिबॉडी विकसित झाल्यानंतर लस यशस्वी मानली जाते. मात्र टी-सेल मुळे जेवढी रोग प्रतिकारशक्ती विकसित होते तेवढी अँटीबॉडीमुळे तयार होत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications