जीवाशी खेळ! कोरोना संक्रमित होण्यासाठी 30 हजार लोकांची तयारी... By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 4:30 PM1 / 11जगभरात कोरोनावर प्रभावी लस तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, लस तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने असते. ही प्रक्रिया वेगात होण्यासाठी एका संस्थेने अनोखी मोहीम सुरू केली आहे. 2 / 11या मोहिमेअंतर्गत निरोगी स्वयंसेवकांची यादी तयार केली जात आहे, जे लसीच्या चाचण्यांसाठी जाणूनबुजून कोरोना संक्रमित होण्यास इच्छुक आहेत.3 / 11वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, 1 Day Sooner नावाच्या ऑनलाइन संस्थेने ही मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत, विविध देशांचे लोक संस्थेच्या वेबसाइटवर स्वयंसेवक होण्यासाठी आपली नावे नोंदवू शकतात. आतापर्यंत संस्थेने सुमारे 30108 स्वयंसेवक एकत्र केले आहेत.4 / 11दरम्यान, सर्वसाधारणपणे लस चाचणीवेळी निरोगी लोकांना लस दिली जाते. मात्र, त्यांना जाणूनबुजून संक्रमित केले जात नाही. लसीचा डोस दिल्यानंतर, शास्त्रज्ञ वाट पाहातात की, व्यक्ती स्वतःहून संक्रमित होईल आणि त्याच्या शरीरात होणाऱ्या प्रतिक्रिया समजू शकतील. 5 / 11मात्र, अशा परिस्थितीत बराच काळ लागू शकेल आणि जर कोणत्याही कम्युनिटीमध्ये कोरोनाची प्रकरणे कमी झाली तर स्वयंसेवकांना याची लागण होणे आवश्यक नाही. अशात लस तयार करण्यास विलंब होऊ शकतो.6 / 11लस तयार करण्याची गती कशी वाढेल? : 1 Day Sooner नावाची संस्था मानवी आव्हानाच्या चाचणीसाठी वकिली करीत आहे. संस्थेचे म्हणणे आहे की, जे स्वत: पुढे येत आहेत, त्यांना लसीचा डोस द्यावा आणि नंतर त्यांना विषाणूचे संक्रमन करावे. अशा परिस्थितीत लसीचा निकाल त्वरीत सापडतो आणि कोट्यावधी लोकांचे जीव वाचविले जाऊ शकतात.7 / 11दरम्यान, 1 Day Sooner संस्थेच्या कल्पनेला बाजूला ठेवून आतापर्यंत कोणत्याही देशाच्या आरोग्य संस्थांनी लस स्वयंसेवकांना जाणूनबुजून संक्रमित करण्यास परवानगी दिला नाही. यामागे एक कारण म्हणजे कोरोना आजार हा बर्याच लोकांना जीवघेणा ठरू शकतो. मात्र, जगभरातील अनेक स्तरांवर मानवी आव्हानांच्या चाचण्यांविषयी निश्चितच चर्चा होत आहे.8 / 111 Day Sooner संस्थेचे म्हणणे आहे की, मानवी आव्हानांच्या चाचणीला परवानगी मिळाल्यास लस लवकरच तयार होईल आणि लाखो लोकांचे जीव वाचतील. संस्थेचे स्वयंसेवक म्हणून स्वतःचे नाव देणारी 29 वर्षीय अप्रेल सिंपकिंसने सांगितले की, 'ज्यापद्धतीने जगभरात कोरोना पसरत आहे, याबद्दल मला असहाय्य वाटले. मात्र, ज्यावेळी मला 1 Day Sooner बद्दल समजले त्यावेळी मला वाटले की मी मदत करू शकते.'9 / 111 Day Sooner चे स्वयंसेवक म्हणून फक्त तरुण आणि निरोगी लोक यामध्ये सामील होऊ शकतात. आतापर्यंत 140 पेक्षा जास्त देशांतील 30108 स्वयंसेवकांनी संस्थेच्या वेबसाइटवर नोंदणी केली आहे. 10 / 11वैद्यकीय नीतिशास्त्र मंडळ आणि अन्न व औषध प्रशासनाद्वारे मंजूर झाल्यावरच अशा चाचणीला अमेरिकेत मान्यता दिली जाऊ शकते. दरम्यान, मलेरिया आणि कॉलराची लस तयार करताना मानवी आव्हान चाचण्या घेण्यात आल्या होत्या.11 / 11जगभरात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिंन्स यूनिवर्सिटीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 1.11 कोटी पेक्षाही अधिक झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 528,000 हून अधिक झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications