शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus: हिवाळ्यात कोरोना हाहाकार माजवणार, मृत्यूचे प्रमाणही वाढेल, WHOचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 7:47 AM

1 / 15
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला आहे. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं असलं तरी रुग्णवाढीची साखळी तोडणं शक्य होत नाहीये.
2 / 15
आता येत्या हिवाळ्यात कोरोना युरोपसह जगाच्या बर्‍याच भागांत कहर माजवेल. या काळात रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्यांची संख्या वाढेल आणि मृत्यूचे प्रमाणही वाढेल, असे जागतिक आरोग्य संघटने(डब्ल्यूएचओ)ने म्हटले आहे.
3 / 15
युरोपमधील डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक हेनरी क्लुग म्हणाले, 'हिवाळ्यामध्ये वृद्ध लोकांपेक्षा तरुण लोक या आजाराच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात सापडतील. आम्हाला अनावश्यक भाकीते करायची नाहीत, पण निश्चितच अशी शक्यता आहे.'
4 / 15
हेनरी क्लुग यांनी येत्या काही महिन्यांत तीन मुख्य कारणांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. यामध्ये शाळा पुन्हा सुरू करणे, हिवाळा-थंडीचा हंगाम आणि हिवाळ्यातील वृद्धांचा अधिक मृत्यूदर, त्यामुळेसंसर्ग प्राणघातक ठरण्याची शक्यता आहे.
5 / 15
ते म्हणाले की, जगातील देशांनी त्यांच्या इशाऱ्यानुसार आतापासूनच तयारी करायला हवी. अमेरिकेत शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यामुळे बर्‍याच ठिकाणी संसर्ग पसरण्याच्या घटना घडल्या आहेत. मिसिसिपीच्या एका शाळेत 4000 मुले आणि 600 शिक्षकांना अलग ठेवण्यात आले होते.
6 / 15
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, त्यांनी एक समिती स्थापन केली आहे, जी आरोग्य आणीबाणी घोषित करण्याच्या नियमांमध्ये बदल करेल. कोरोना साथीच्या नंतर डब्ल्यूएचओवर जगाला उशिरा माहिती देण्याचा आरोप आहे.
7 / 15
30 जानेवारीला डब्ल्यूएचओने कोरोनामुळे आरोग्य आणीबाणी जाहीर केली. असा दावा केला जातो की, या काळात चीनमध्ये फक्त 100 प्रकरणे होती.
8 / 15
आता डब्ल्यूएचओने आपल्या नियमांचा आढावा घेण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. नियमांमध्ये काही बदल केले पाहिजेत की नाही त्याचा विचार करण्यात येणार आहे.
9 / 15
दुसरीकडे दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. हेच कारण आहे की, तिथल्या सर्व डॉक्टरांच्या सुट्या तात्काळ प्रभावाने रद्द केल्या गेल्या आहेत आणि त्यांना पुन्हा कामावर परतण्यास सांगितले गेले आहे.
10 / 15
खास बाब म्हणजे हे सर्व असूनही देशातील डॉक्टर तीन दिवसांच्या संपावर जाण्यावर ठाम आहेत. दुसरीकडे सरकारने असे म्हटले आहे की, वेळेत परिस्थिती नियंत्रित करायची आहे, त्यासाठी कठोर पावलेही उचलावी लागत आहेत.
11 / 15
खास बाब म्हणजे हे सर्व असूनही देशातील डॉक्टर तीन दिवसांच्या संपावर जाण्यावर ठाम आहेत. दुसरीकडे सरकारने असे म्हटले आहे की, वेळेत परिस्थिती नियंत्रित करायची आहे, त्यासाठी कठोर पावलेही उचलावी लागत आहेत.
12 / 15
इजिप्तमध्ये कोरोना विषाणूच्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतर देशातील मोठ्या मशिदींचे दरवाजे शुक्रवारी प्रथमच जनतेसाठी उघडण्यात आले.
13 / 15
मार्च महिन्यापासून देशातील सर्व मशिदी बंद करण्यात आल्या होत्या. मशिदी उघडल्यानंतर मोठ्या संख्येने लोक मशिदीत नमाज अदा करण्यासाठी आले होते.
14 / 15
यावेळी लोक सामाजिक अंतरांचे अनुसरण करत होते आणि मास्कही घालत असल्याचं निदर्शनास आलं आहे. लोकांना नमाज अदा करण्यासाठी जंतुनाशक असलेली त्यांची पत्रके आणण्यास सांगितले गेले. लोकांना नमाज अदा करण्यासाठी दहा मिनिटांचा अवधी देण्यात आला.
15 / 15
कैरोमधील अल-अझहर मशिदीचे पर्यवेक्षक अब्दुल मुनीम फौद म्हणाले की, त्यांना आशा आहे की, मशीद यापुढे बंद होणार नाही. ते म्हणाले, “आम्ही ज्या ठिकाणी आवश्यक आहोत, अशा ठिकाणी आहोत. अल्लाने आमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत. लोक या कठीण काळाच्या समाप्तीसाठी प्रार्थना करीत आहेत.'
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या