शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनानंतर आता दुसऱ्या महामारीसाठी सज्ज राहावं; WHO चा जगातील देशांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 10:41 AM

1 / 10
संपूर्ण जग सध्या कोरोना महामारीमुळे ग्रस्त आहे. जगभरातील देशांची अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे की, पुढील महामारीसाठी जगानेही सज्ज राहावं.
2 / 10
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडॅनॉम ग्रेबेसियस यांनी सोमवारी सांगितले की, पुढील महामारीसाठी जगाने अधिक चांगले तयार केली पाहिजे. जगातील देशांना सार्वजनिक आरोग्यात गुंतवणूक करण्याचं आवाहन संघटनेनं केलं आहे.
3 / 10
डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात पहिल्यांदा कोरोना विषाणूचा रुग्ण समोर आला होता. त्यानंतर आतापर्यंत जगातील २.७० कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जगभरात या विषाणूमुळे ८,८८,३२६ लोक मरण पावले आहेत.
4 / 10
ही महामारी शेवटची नाही, इतिहासाने आपल्याला शिकवलं आहे, उद्रेक आणि साथीचा रोग जीवनाचं कटू वास्तव आहे.
5 / 10
परंतु जेव्हा पुढची महामारी येईल तेव्हा जगाने तयार राहिले पाहिजे. या वेळेपेक्षा जास्त तयारी जगातील सर्व देशांना ठेवावी लागेल असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.
6 / 10
याआधी, ऑगस्टच्या सुरूवातीस, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूबद्दल इशारा दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की, कोरोना व्हायरल खूप काळ राहू शकतो. डब्ल्यूएचओने कोविड -१९ च्या सहा महिन्यांच्या मूल्यांकनावर आणीबाणी समितीशी बैठक घेतल्यानंतर हे सांगितले होते.
7 / 10
डब्ल्यूएचओने एका निवेदनात म्हटलं आहे की समितीने कोविड -१९ साथीचा दीर्घकालीन अंदाज वर्तविला आहे. कोरोना विषाणूच्या अस्तित्वाला सात महिने झाले आहेत आणि दरम्यान समितीने कोरोना विषाणूच्या जोखमीचे आकलन करण्यासाठी चार वेळा बैठक घेतली आहे.
8 / 10
कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी तसंच या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लस आणि औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक देशात लसीच्या शेवटच्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे मधल्या काळात शास्त्रज्ञांमध्येही उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं.
9 / 10
दरम्यान रशियानं लस यशस्वीरित्या तयार केल्याचा दावा केला होता. चाचणीदरम्यान स्वयंसेवकांवर साईड इफेक्ट्स दिसून आल्यानंतर रशियाला टिकेला सामोरं जावं लागलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी याआधीही लसीबाबत चिंतानजनक स्थिती असल्याचे मत व्यक्त केले होते.
10 / 10
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी कोरोना व्हायरसच्या लसीचे मोठ्या प्रमाणात लसीकरण २०२१ मध्यापर्यंत शक्य नसल्याचा खळबळजनक दावा केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना WHO च्या या दाव्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना