भय इथले संपत नाही! ...तर 2021च्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट येणार; WHOने दिला गंभीर इशारा By सायली शिर्के | Published: November 23, 2020 3:41 PM1 / 15कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांच्या संख्येने तब्बल पाच कोटींचा टप्पा पार केला आहे.2 / 15कोरोनाचा संसर्ग वाढल्याने काही देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे, लाखो लोकांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर अनेकांवर उपचार सुरू आहेत. 3 / 15सोशल डिस्टंसिंगचं पालन गांभीर्याने न केल्यास आणि मास्क न लावल्यास 2021 च्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा गंभीर इशारा WHOने दिला आहे. 4 / 15जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जग आणि विशेषत: युरोपियन देशांना असा इशारा दिला आहे. योग्य ती काळजी न घेतल्यास कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असल्याचं म्हटलं आहे.5 / 15युरोपीयन देशांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुरेसे उपाय केले नाहीत, त्यामुळे युरोपियन देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. 6 / 15WHOचे विशेष दूत डेविड नाबरो कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची हीच वेळ आहे. अन्यथा 2021 च्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असं म्हटलं आहे.7 / 15जगभरात आतापर्यंत 5.89 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, यांपैकी 4.07 कोटी लोकं निरोगी झाले आहेत. तर, 13.93 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 8 / 15दिलासादायक बाब म्हणजे अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनमध्ये लवकरच लस येत आहे. जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांनीही डिसेंबरपर्यंत त्यांच्या देशात लसीकरण सुरू होईल याबाबत माहिती दिली आहे.9 / 15WHOच्या मते, कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. जर्मनी आणि फ्रान्समध्ये मिळून 33 हजार नवीन प्रकरणांची नोंद झाली. स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियामध्ये दररोज हजारो प्रकरणे नोंदवली जात आहेत.10 / 15तुर्कीमध्ये 5,532 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. याशिवाय आशियातही पुन्हा प्रकरणे वाढत आहेत. नाबरो यांनी लोकांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.11 / 15कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूच्या बाबतीत अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. मात्र बायडन सरकारने येथील लोकांना एक दिलासादायक बातमी दिली आहे. 11 डिसेंबर रोजी अमेरिकेतील पहिल्या व्यक्तीला लस दिली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 15कोरोना व्हायरसवर जगभरात संशोधन सुरू असून लसीच्या चाचणीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी कोरोना लसीसंदर्भात मोठं विधान केलं आहे.13 / 15कोणतीही लस कोरोनावर पूर्णपणे मात करू शकत नाही असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. WHO प्रमुखांनी कोरोना लसीसंदर्भात केलेल्या विधानामुळे चिंतेत भर पडली आहे.14 / 15'जगात कोरोनावर कोणतीही लस तयार केली गेली तरी ती कोरोना महामारी रोखू शकत नाही असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. तसेच 'लस आल्यानंतर ती करोनाशी लढण्यासाठी आपण वापरत असलेल्या इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणूनच काम करेल.'15 / 15'कोरोनाची लस आल्यानंतर ज्याचा आता वापर केला जात आहे ती सर्व सिस्टम रिप्लेस करेल असं होणार नाही' असं देखील म्हटलं आहे. तसेच त्यांनी कोरोना लसीच्या सप्लाय चेनबाबतही माहिती दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications