Coronavirus: ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ औषधासाठी डोनाल्ड ट्रम्प आग्रही का?; अमेरिकन दैनिकाचा मोठा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 2:25 PM
1 / 10 संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे चिंतेत आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालं नाही. कोरोना महामारीच्या सामना करणाऱ्या अमेरिकेने भारताची मदत मागितली आहे. त्यासाठी अमेरिकेने भारताला धमकीवजा इशाराही दिला आहे. 2 / 10 अमेरिका फक्त एका औषधासाठी भारताचे मागे का लागली आहे. या औषधाचे नाव हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आहे. या औषधासाठी डोनाल्ड ट्रम्प आग्रही का आहेत? त्यामागे काही आंतरराष्ट्रीय दबाव आहे का? किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणताही वैयक्तिक हेतू? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. 3 / 10 भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाची गरज आणि साठा लक्षात घेऊन कोरोनाबाधित देशांना याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. हे औषध भारतात मोठ्या प्रमाणात बनविले जात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. 4 / 10 अमेरिकेचे वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर याबाबत खुलासा केला आहे की या मलेरिया औषधामागे डोनाल्ड ट्रम्प आग्रही का आहेत? यात डोनाल्ड ट्रम्प यांचा वैयक्तिक फायदा असल्याचं मीडियाने म्हटलं आहे. 5 / 10 न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, जर हायड्रॉक्सीक्लोरोक्विनला जगभरात कोरोनाचा उपचार करण्याची परवानगी दिली गेली तर मग ही औषधे बनविणार्या कंपन्यांना मोठा फायदा होईल. अशाच एका कंपनीत डोनाल्ड ट्रम्प यांचे शेअर्स आहेत. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांचे त्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी घनिष्ट संबंध आहेत. 6 / 10 वेबसाइटने केलेल्या दाव्यानुसार फ्रान्सची औषध उत्पादन कंपनी सैनोफीशी संबंध डोनाल्ड ट्रम्प यांचा वैयक्तिक फायदा आहे. ट्रम्प यांचेही कंपनीत समभाग आहेत. ही कंपनी प्लॅकेनिल या ब्रँड नावाने बाजारात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध विकते. 7 / 10 मलेरियासारख्या धोकादायक आजारांशी लढण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर केला जातो. दरवर्षी भारतात मोठ्या प्रमाणात लोक मलेरियाचे बळी पडतात. म्हणूनच भारतीय औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात या औषधाचं उत्पादन करतात. 8 / 10 विशेष म्हणजे अमेरिकेसारख्या देशात कोरोना रुग्णांना हे औषध दिले जात आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी हे उपयुक्त देखील आहे. त्यामुळेच या औषधाची मागणी वाढत आहे. दरम्यान, अलिकडच्या काळात भारतात या औषधाच्या उत्पादनात काही प्रमाणात घट झाली आहे. त्याची निर्यातही बंद झाली होती पण पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 9 / 10 हे औषध अँटी-मलेरिया औषध क्लोरोक्विनपेक्षा थोडेसे वेगळे आहे. ही एक टॅबलेट आहे ज्याचा वापर ऑटोइम्यून आजारांवर केला जातो. परंतु कोरोना रोखण्यासाठीही याचा उपयोग होत असल्याचं दिसून आलं आहे. 10 / 10 या औषधाचा परिणाम सार्स-सीओव्ही -2 वर पडतो. याच व्हायरसपासून कोविड -१९ तयार होतो. त्यामुळेच कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या दिल्या जात आहेत. आणखी वाचा