CoronaVirus: Work is underway to develop a vaccine for coronavirus disease worldwide mac
CoronaVirus News: आशेचा किरण! कोरोना लसीवर 'हे' पाच देश करताहेत महत्त्वाचं संशोधन By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 12:25 PM1 / 8जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 43 लाख 35 हजारांवर पोहचली आहे. तर आतापर्यत 2 लाख 92 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 92 हजार 815 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 16 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. 2 / 8कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. 3 / 8आतापर्यंत कोरोना व्हायरसवर लस शोधण्यात कोणत्याही देशाला यश आलं नाही. कोरोनावर लस उपलब्ध नसल्याने संक्रमण साखळी तोडणे सर्व देशांसमोर आव्हानात्मक झालं आहे. मात्र काही दिवसांआधी इस्रायलमधील संशोधकांना कोरोनावर मात करण्यासाठी लस तयार करण्यात यश आलं असल्याचा दावा करण्यात आला आहे. इस्रायलसह अन्य महत्वाचे देशांकडूनही कोरोनावर मात करण्साठी लवकरच लस तयार करु असा दावा करण्यात येत आहे.4 / 8इस्त्रायलचे संरक्षण मंत्री नफताली बेनेट यांनी सोमवारी दावा केला की देशाच्या संरक्षण जैविक संस्थेने कोरोना विषाणूची लस बनविली आहे. ते म्हणाले की कोरोनाला रोखण्यासाठी अँटीबॉडी तयार करण्यात संस्थेने मोठे यश संपादन केले आहे. तसेच कोरोना व्हायरस लसीला विकसित करण्याचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे संशोधक आता त्याच्या पेटंट आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची तयारी करत असल्याची माहिती नफताली बेनेट यांनी दिली आहे.5 / 8इटलीनेदेखील कोरोना वॅक्सीन तयार केलं असल्याचा दावा केला आहे. इटलीने केलेल्या दाव्यानूसार रोमच्या स्पल्नजानी रूग्णालयात करण्यात आलेल्या परिक्षणातून अॅन्टिबॉडीज शोधण्यात आल्या आहेत.6 / 8जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहे. त्यामुळे अमेरिका देखील कोरोनाच्या उपचारासाठी लस तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. अमेरिकेतील दोन कंपन्या कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यामध्ये मॉडर्ना, ही अमेरिकेतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अॅन्ड इनफेक्शियस डिजीजसोबत शोध घेत आहे. तर दुसरी कंपनी फायजर कंपनीचा समावेश आहे.7 / 8 चीनच्या वुहान प्रांतातून कोरोनाचा सर्वात प्रथम फैलाव झाला. यानंतर कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. चीन देखील कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणवर प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमधील तीन वॅक्सिनचं ह्युमन ट्रायल सुरु आहे. पहिल्या वॅक्सीनची चीनमधील कँसिनो बॉयोलॉजिक्स, इन्स्टीट्यूट ऑफ बॉयोटेक्नोलॉजी आणि चायनीज अॅकॅडमी ऑफ मिलिट्री मेडिकल सायन्स एकत्र येऊन टेस्ट करत आहेत.8 / 8ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने कोरोना वॅक्सीन तयार करण्याचा दावा केला आहे. ब्रिटनने केलेल्या दाव्यानुसार, आता कोरोनाच्या वॅक्सीनचं 200 रूग्णालयांतील जवळपास 5 हजारांहून अधिक लोकांवर परिक्षण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आता माणसांवर देखील लसीची चाचणी केली जात असल्याचा दावा ब्रिटनने केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications