शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! वुहानमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर; फक्त 4 दिवसांत 90 टक्के लोकसंख्येची केली चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 2:46 PM

1 / 16
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 20 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 16
चीनमधील वुहान शहरात पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागल्याने प्रशासनाने सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
3 / 16
गेल्या चार दिवसांत वुहानमधील प्रशासनाने 1.1 कोटी जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. वुहानची लोकसंख्या 1.2 कोटी इतकी आहे. जवळपास 90 टक्क्यांहून अधिक जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.
4 / 16
वुहानमध्ये सहा नवीन कोरोनाबाधित आढळले. त्याशिवाय कोणतीही लक्षणे नसलेले व कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेले 15 जण आढळले आहेत. शुक्रवारपर्यंत हुबेई प्रांतात 47 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये 31 बाधित हे स्थानिक आहेत.
5 / 16
वुहानमध्ये लक्षणे दिसून आलेल्या 64 जणांना डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूक्लिक अॅसिड टेस्टिंगसाठी आतापर्यंत 1.12 कोटी जणांचे नमुने घेण्यात आले आहेत.
6 / 16
हुबेई प्रांतातील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे उपसंचालक ली यांग यांनी शिन्हुआ या वृत्तसंस्थेला वुहान शहरामध्ये चार ऑगस्टपासून चाचणी सुरू करण्यात आली. आतापर्यंत 1 कोटीहून अधिकजणांचे चाचणी परिणामही समोर आले आहेत अशी माहिती दिली.
7 / 16
वुहानमधील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अजून चाचणीसाठी नमुने जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चीनमध्ये सध्या 1444 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 39 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8 / 16
वुहानमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं जातं. काही महिन्यांमध्ये चीनने कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाची लाट आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
9 / 16
कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता चीनने बुधवारी झांगजियाजेई शहर सील केलं आहे. तसेच शहरातील स्थानिक नेत्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
10 / 16
कोरोना व्हायरसचा प्रसार आता 17 प्रांतात झाला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. चीनची एक चूक यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी चीनकडून खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत.
11 / 16
दररोज हजारो लोकांची कोरोना चाचणी केली जाते. त्यानंतरही कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार झाला. चीनमध्ये नव्याने पसरलेल्या संसर्गामागे मॉस्कोमधून आलेले प्रवाशी कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं.
12 / 16
जुलै महिन्यातील मध्यात चीनमधील नानजिंग शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मॉस्कोहून एक प्रवासी विमान आले होते. त्यातील सात जणांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली. 7 कोरोनाग्रस्तांकडून विमानतळावरील सफाई कर्मचाऱ्यांना देखील लागण झाली होती.
13 / 16
20 जुलैपर्यंत 9 जणांना कोरोनाची लागण झाली. या बाधित कर्मचाऱ्यांकडून इतरांना संसर्ग झाला. काही दिवसांमध्ये डेल्टा व्हेरिएंट नानजिंगपासून 1900 किमी दूर असलेल्या हैनानमध्ये दाखल झाला. विमानतळावरून सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग इतर प्रांतात देखील झाला.
14 / 16
चीनमध्ये (China) केलेल्या एका रिसर्चमध्ये नवी माहिती समोर आली आहे. रिसर्चनुसार, सामान्य व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाकात 1000 पटीने अधिक व्हायरस असतात.
15 / 16
कोरोनाचा मूळ वुहान व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट खूपच संसर्गजन्य आणि धोकादायक आहे असं देखील म्हटलं आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे संसर्ग झालेली व्यक्ती अधिक व्हायरस बाहेर टाकते, असं एका संशोधकाचे म्हणणं आहे. म्हणूनच हा व्हेरिएंट अधिक लोकांना संक्रमित करतो.
16 / 16
चीनचे गुआंगडोंग प्रोविंशियल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशन डिपार्टमेंटचे संशोधक जिंग लू आणि सहकाऱ्यांनी 62 कोरोना बाधितांवर संशोधन केलं आहे. सद्यस्थितीत चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसchinaचीन