शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Omicron, Cotton Mask: वेगाने पसरणारा ओमायक्रॉन आणि रंगबेरंगी कापडी मास्क; जाणून घ्या तज्ज्ञ का इशारा देतायत...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 7:23 PM

1 / 8
ओमायक्रॉनने लोकांना पुन्हा एकदा मास्क कोणता वापरावा यावर विचार करण्यास भाग पाडले आहे. कापडी मास्क किती सुरक्षित हा प्रश्न आजही तसाच आहे.
2 / 8
पाच रुपयांचा सर्जिकल मास्क सुरक्षित नसल्याचे संशोधनात समोर आले होते. मात्र, लोक सर्रास आता विविध रंगाचे, डिझाईनचे कापडी मास्क घालत आहेत. यावर ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाच्या प्राथमिक आरोग्य सेवांचे प्राध्यापक ट्रीश ग्रीनहाल यांनी इशारा दिला आहे.
3 / 8
पुन्हा वापरता येणारे कापडी मास्क हे चांगले आहेत की धोकायदायक हे त्यामध्ये वापरलेल्या मटेरिअलवर अवलंबून असल्याचे ग्रीनहाल यांनी म्हटले आहे. विविध साहित्याच्या मिश्रणातून बनविलेले डबल किंवा ट्रिपल लेअरचे मास्क अधिक प्रभावी असू शकतात. मात्र, अधिकतर कापडी मास्कमध्ये फॅशनेबल साहित्य वापरल्याचे दिसत असल्याचे ते म्हणाले.
4 / 8
ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा 70 टक्के अधिक वेगाने पसरणारा आहे. जगभरातील सरकारे हा व्हेरिअंट रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्वत्र मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याशिवाय बाजारात, दुकानांमध्ये किंवा सार्वजनिक वाहतुकीमध्ये मास्कशिवाय एन्ट्री दिली जात नाहीय. तसेच दंडही केला जात आहे. असे असताना ग्रीनहाल यांचे म्हणणे विचार करायला लावणारे आहे.
5 / 8
सुरुवातीच्या काळात एन 95 मास्क पुरेसे नव्हते. तसेच कापडी मास्क पैसे वाचविणारे होते. शिवाय ते पुन्हा पुन्हा वापरता येणारे होते. कापडी मास्कना कोणत्याही प्रकारचे आरोग्य मानक पूर्ण करावे लागत नाहीत. म्हणजेच ते कितपत सुरक्षित आहेत हे समजत नाही.
6 / 8
परंतू एन 95 मास्कना 95 टक्के कण फिल्टर करतात, किती मायक्रॉनपर्यंत फिल्टर करतात हे सिद्ध करावे लागते. तसेच ते योग्य प्रकारे नाक आणि तोंड झाकतात का, मध्ये गॅप तर राहत नाही ना हे देखील पहावे लागते. नाहीतर फिल्टर होत नाही.
7 / 8
मास्कद्वारे श्वास घ्यायला समस्या होऊ नये, हे जरी खरे असले तरी लोक पर्यावरण किंवा पैसे वाचविण्यासाठी कापडी मास्क पसंत करतात. कारण त्यांना धुवून पुन्हा वापरता येते. यापेक्षा आताबाजारात पुन्हा पुन्हा वापरता येणारे चांगल्या दर्जाचे मास्क उपलब्ध आहेत, जे फिल्टर मानक देखील पूर्ण करतात, असे ग्रीनहाल म्हणाले. म्हणजेच ग्रीनहाल यांनी चांगले, सुरक्षित मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.
8 / 8
ओन्टारियोचे सायन्स अॅडवायझरी टेबलचे प्रमुख पीटर जुनी यांनी गेल्या आठवड्यात सीटीव्ही न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सिंगल लेअरचे मास्क किती धोकादायक आहेत हे सांगितले आहे. जर तुमच्याकडे सिंगल लेअरचा मास्क आहे, त्याची फिल्टर क्षमता अजिबात म्हणजेच खूपच कमी असते. तसेच हा मास्क लावल्याने काही फरक पडणार नाही.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन