This couple has 22 children, the eldest being 32 years old and the youngest 1 year old
या दांपत्याला आहेत 22 अपत्ये, सर्वात मोठ्या मुलाचे वय 32 तर लहान्याचे 1 वर्ष By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 3:36 PM1 / 9 एका जॉइंट फॅमिलीमध्ये 25-30 सदस्य असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले किंवा ऐकले असेल. पण, एकाच दांपत्याला 22 आपत्ये असल्याचे कधीच ऐकले नसेल. लंकाशायरमध्ये राहणाऱ्या सू रेडफोर्ड आणि नोएल रेडफोर्डला 22 मुले आहेत.2 / 9 इतकी मुले असल्यामुळे कधी-कधी परिस्थिती हाताबाहेर जाते. कुठे बाहेर फिरायला गेल्यावर या दांपत्याला आपल्या सर्व मुलांवरही लक्ष्य ठेवणे अवघड आहे.3 / 9 द सनच्या रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वीच सू ने इंस्टाग्रामवर आपली फॅमिली फोटो शेअर केली. हा फोटो स्टॅफोर्डशायरच्या पॉपुलर थीम पार्कमध्ये रोलरकोस्टरचा आनंद घेतानाचा आहे. 4 / 9 सू आणि नोएलला 22 मुलं आहेत. सर्वात मोठा मुलगा क्रिस 32 वर्षांचा आणि सर्वात लहान मुलगा हॅडी 1 वर्षाचा आहे. या दोघांशिवाय सोफी (27), क्लो (26), जॅक (24), डॅनियल (22), ल्यूक (20), मिली (19), केटी (18), जेम्स (17), ऐली (16), एमी (15), जोश (14), मॅक्स (12), टिली (11), ऑस्कर (9), कैस्पर (8), हॅली (6) फोएबे (5) आर्ची (3) बोनी (2) आणि हैडी (1) आहेत.5 / 9 विशेष म्हणजे, हे कुटुंब सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांवर नाही, तर स्वतच्या पाय शॉप बिझनेसवर घर चालवतं. इतक्या मुलांना सांभळणं सोपी गोष्ट नाही, हजारो लाखो रुपये महिन्याला खर्च करावे लागतात.6 / 9 हे सर्वजण 10 बेडरुम असलेल्या एका घरात राहतात आणि नेहमीच इंस्टाग्रामवर आपल्या हाय लाइफस्टाइलचे फोटो टाकत असतात. त्यांच्या घरात एक आउटडोर सिनेमा, टीव्ही बेड आणि मोठे फ्रिज आहे.7 / 9 काही दिवसांपूर्वीच या कुटुंबावर चॅनेल 5 नावाच्या चॅनेलने 22 किड्स अँड काउंटिंग नावाचा शो शूट केला होता. त्या शोमध्ये या कुटुंबाचे दैनंदिन आयुष्य दाखवण्यात आले होते.8 / 9 या शोमध्ये सूने सांगितले की, ती 16 व्या वर्षापासून प्रेगनंट होत असून, या सर्व मुलांच्या पालन-पोषणासाठी आतापर्यंत £1 मिलियन (10 कोटींपेक्षा जास्त) खर्च केले आहेत.9 / 9 सू साठी 22 मुलांचा सांभळ करणे सोपे नाही. दिवसातील अनेक तास घर आवरण्यातच जाते, यानंतर उरलेला वेळ जेवण तयार करणे आणि मुलांचे कपडे धुण्यात जातो. या सर्वांचे कपडे धुण्यासाठी घरात मोठी वॉशिंग मशीन लावण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications