तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 23:33 IST
1 / 11ब्रिटिश अमेरिकन टोबॅको नावाच्या कंपनीची सब्सिडिअरी कंपनी असलेल्या केंटकी बायोप्रोसेसिंगने एप्रिल महिन्यात म्हटले होते, की ते कोविड-19 वरील एक प्रायोगिक लस तयार करत आहेत. ही लस तंबाखूपासून तयार करण्यात येत होती. आता या कंपनीने, आम्ही लवकरच या लसीची मानवी चाचणी करणार आहोत, असे म्हटले आहे. 2 / 11लंदनमधील लकी स्ट्राइक सिगारेट तयार करणाऱ्या या कंपनीने दावा केला आहे, की त्यांनी तंबाखूच्या पानापासून निघणाऱ्या प्रोटीनपासून लस तयार केली आहे.3 / 11लकी स्ट्राइक सिगरेटचे मुख्य मार्केटिंग ऑफिसर किंग्सले व्हिटन यांनी सांगितले, की कंपनीने अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनकडे मानवी चाचणीच्या परवानगीसाठी अर्ज सादर केला आहे. ही परवानगी कोणत्याही क्षणी मिळू शकते.4 / 11व्हिटन म्हणाले, मानवी चाचणीसाठी परवानगी मिळेल याची अम्हाला पूर्ण आशा आहे. आमच्या लसीने प्री-क्लिनिकल ट्रायलमध्ये कोविड-19 विरुद्ध चांगले काम केले आहे. 5 / 11कंपनीने दावा केला आहे, की आम्ही ज्या पद्धतीने लस तयार करत आहोत, ती अत्यंत वेगळी आहे. आम्ही तंबाखूच्या झाडापासून प्रोटीन काढून ते कोविड-19 लसीच्या जीनोमसोबत एकत्र केले आहे. यानंतर आमची लस तयार झाली आहे.6 / 11कंपनीने म्हटले आहे, की पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत, या पद्धतीने लस तयार करायला कमी वेळ लागतो. यापद्धतीने आपण महिन्याऐवजी केवळ एका आठवड्यातच लस तयार करू शकतो, हा या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा आहे. 7 / 11सध्या संपूर्ण जगातील तंबाखू उत्पादक कोरोनावरील लस तयार करण्याच्या शर्यतीत उतरले आहेत. फिलिफ मॉरिस इंटरनॅशनलच्या मेडिकागो इनकॉर्पोरेशन कंपनीदेखील तंबाखूवर आधारीत लस तयार करण्याच्या कामात लागली आहे. कंपनीने दावा केला आहे, की त्यांची लस पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तयार असेल.8 / 11सध्या जगभरात 24 लसींचे क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. मात्र त्यांच्या यशस्वीतेचा दर सध्या 10 टक्केच दिसत आहे, असे WHO च्या मुख्य सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.9 / 11सौम्या म्हणाल्या, तंबाखूपासून लस तयार करणे, ऐकायला थोडे विचित्र वाटते. मात्र, असेही होऊ शकते, की ही लस यशस्वी ठरेल. 10 / 11तसेच हिच्यामुळे शरिरात इतर प्रकारचे साइड-इफेक्ट्सदेखील होऊ शकतात. कारण सिगारेट घेतल्याने कोरोना रुग्णांची समस्या अधिक वाढत आहे, असेही सौम्या म्हणाल्या. 11 / 11तसेच हिच्यामुळे शरिरात इतर प्रकारचे साइड-इफेक्ट्सदेखील होऊ शकतात. कारण सिगारेट घेतल्याने कोरोना रुग्णांची समस्या अधिक वाढत आहे, असेही सौम्या म्हणाल्या.