शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीननं 'असा' घेतला कोरोनाचा फायदा; लडाखमध्ये पटकावल्या मोक्याच्या जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 8:52 PM

1 / 10
सध्या लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आलं आहे. चीन आणि भारतानं लडाखच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे.
2 / 10
संपूर्ण जगात चीनमधून कोरोना पसरला. त्याच कोरोनाचा गैरफायदा घेऊन चीननं लडाखमध्ये मोठी आगेकूच केली.
3 / 10
दर उन्हाळ्यात भारतीय सैन्य लडाखमध्ये सराव करतं. यंदा त्याला कोरोनामुळे उशीर झाला. त्याचा नेमका फायदा चीननं घेतला.
4 / 10
मार्चच्या सुरुवातीला भारतीय लष्कर आणि इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस लडाखमध्ये सराव करणार होते. मात्र एका जवानाला कोरोनाची लागण झाल्यानं सब सेक्टर नॉर्थमध्ये होणारा सराव पुढे ढकलण्यात आला.
5 / 10
दुसऱ्या आठवड्यात लष्कराचा आणखी एक जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. यानंतर सतर्कतेचे उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यास जवानांना मज्जाव करण्यात आला.
6 / 10
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सैन्याला विविध सूचना देण्यात आल्या. त्यातच सराव पुढे ढकलण्याचीही सूचना होती.
7 / 10
चिनी सैन्यानंदेखील त्यांचा सराव पुढे ढकलला होता. मात्र भारतीय सैन्याची परिस्थिती पाहता त्यांनी अचानक आगेकूच सुरू केली.
8 / 10
चीननं गलवान खोऱ्यात आणि पँगाँग तलाव परिसरात पुन्हा एकदा सैन्य तैनात केलं. सामरिकदृष्ट्या या भागांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
9 / 10
चीननं उचलेली पावलं भारतीय सैन्यासाठी अतिशय अनपेक्षित होती. त्यांनी लगेच हालचाली सुरू केल्या. कोरोनामुळे घालून देण्यात आलेले निर्बंध बाजूला ठेवून सीमावर्ती भागातल्या मोक्याच्या जागांवरील तैनातीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले.
10 / 10
चीननं आधी सुरुवात केल्यामुळे त्यांना जास्त फायदा मिळाला. सध्या गलवानच्या खोऱ्यात चीनचे तब्बल ३ हजार ४००, तर पँगाँग तलाव परिसरात ३ हजार ६०० सैनिक तैनात आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन