शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : टेन्शन वाढलं! "कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट असणार अत्यंत घातक"; डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 2:30 PM

1 / 7
कोरोना व्हायरसमुळे जगाचं टेन्शन वाढलं आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तेथील लोक रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करत आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा चीनच्या विविध भागात कहर पाहायला मिळत आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा कोरोनाबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
2 / 7
एका संशोधनात असा इशारा देण्यात आला आहे की, जगभरात कोरोना व्हायरसचे नवीन रूप खूप प्राणघातक असेल. सध्या जगात कोरोनाचे सौम्य प्रकार वेगाने पसरले आहेत. अतिशय वेगाने पसरणारा Omicron व्हेरिएंट एका वर्षापासून पसरत आहे आणि जगातील जवळजवळ प्रत्येक देशात त्याचे अनेक प्रकार जन्माला आले आहेत.
3 / 7
ओमायक्रॉनच्या नवीन स्वरूपाचा प्रभाव सौम्य आहे परंतु अनेक संशोधकांचा असा विश्वास होता की हा एक प्रकारे कोरोनाचा शेवट आहे, जसे की इतर अनेक व्हायरसबाबत घडले आहे. म्यूटेशन पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
4 / 7
दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांनी म्हटले आहे की, हा व्हायरस अजूनही खूप प्राणघातक ठरण्याची क्षमता आहे. त्यांनी हा खुलासा एका एचआयव्ही रुग्णाची तपासणी केल्यानंतर केला आहे, ज्याच्या आत गेल्या 6 महिन्यांपासून कोरोना व्हायरस होता.
5 / 7
हे संशोधन करणारे व्हायरोलॉजिस्ट प्रोफेसर एलेक्स सिगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस कालांतराने विकसित झाला आहे. यामुळे फुफ्फुसात जळजळ वाढली आहे. हे परिणाम पूर्वीच्या कोविड स्ट्रेनने संक्रमित झालेल्यांपेक्षा ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्यांशी अधिक जवळून संबंधित आहेत.
6 / 7
दक्षिण आफ्रिकेचा हा रुग्ण ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या प्रदीर्घ काळातील रुग्णांपैकी एक आहे. हा रुग्ण एचआयव्हीने ग्रस्त असून त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली होती. यामुळे संसर्ग पूर्णपणे संपुष्टात आला नाही, ज्यामुळे व्हायरस इतरांमध्ये पसरण्यापूर्वी शरीरात म्यूटेट होत राहिला.
7 / 7
दक्षिण आफ्रिकेचा रिसर्च हे देखील दर्शवितो की लस आणि पूर्वीच्या संसर्गामुळे जग त्यावर मात करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक तयार आहे. जगाला पुन्हा कोरोनाशी लढण्यासाठी स्वतःला तयार करावे लागेल. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनchinaचीन