शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus Origin: चीनच्या वुहान बाजारातून दोन कोरोना विषाणू बाहेर पडले; जगात माजवला हाहाकार, संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 11:06 AM

1 / 9
Covid 19 Origin Wuhan Market : जगभरात लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus Virus) स्रोताबाबत मोठा खुलासा झाला आहे. दोन निरनिराळे कोरोना विषाणू चीनच्या वुहानच्या बाजारातून जिवंत विकल्या जाणाऱ्या पशूंद्वारे पसरत होते, असं मत संशोधकांनी एका नव्या संशोधनादरम्यान व्यक्त केलं आहे.
2 / 9
त्यातून तो मानवात पसरला आणि ही महासाथ जगभर पसरली, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. जूनच्या सुरुवातीला, जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केली होती की शास्त्रज्ञ लॅब लिकसह कोरोना विषाणूचे सर्व संभाव्य स्त्रोत शोधण्यासाठी संशोधन सुरू ठेवावे.
3 / 9
सीएनएनच्या अहवालानुसार, दोन नवीन संशोधनांमध्ये पूर्णपणे भिन्न दृष्टीकोन स्वीकारण्यात आला होता. परंतु दोन्ही एकाच निष्कर्षावर आले. हा निष्कर्ष चीनच्या वुहान शहरातील हुआनान सीफूड मार्केटचा होता. हेच मार्केट कोरोना विषाणूचं केंद्रस्थान होतं अशी सर्वाधिक शक्यता यातून व्यक्त करण्यात आली.
4 / 9
हे संशोधन सायन्स जर्नलमध्ये मंगळवारी प्रकाशित झाले आहे. एका संशोधनात जगभरातील शास्त्रज्ञांनी मॅपिंग टूल्स आणि सोशल मीडिया रिपोर्ट्सचा वापर केला. त्यांना आढळले की नेमकी परिस्थिती निश्चित करणे खूप कठीण असले तरी, २०१९ या वर्षाच्या दिवसांत वुहान मार्केटमध्ये जिवंत विकल्या गेलेल्या प्राण्यांमध्ये हा विषाणू उपस्थित होता.
5 / 9
या प्राण्यांना एकमेकांच्या अगदी जवळ ठेवण्यात आले होते, ज्यामुळे त्यांच्यामध्ये विषाणूची देवाणघेवाण अगदी सहजपणे होऊ शकली. मात्र, या संशोधनात कोणता प्राणी आधी आजारी पडला हे अद्याप कळू शकलेले नाही.
6 / 9
संशोधकांनी शोधून काढले की सुरुवातीच्या COVID-19 प्रकरणे वुहान मार्केटमधील विक्रेत्यांमध्ये केंद्रित होती. हे विक्रेते हे जिवंत प्राणी विकायचे. याशिवाय ते लोकही सुरुवातीच्या कालावधीत कोरोनाचे बळी ठरले जे या बाजारातून वस्तू खरेदी करायचे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की दोन भिन्न विषाणू प्राण्यांमध्ये संक्रमित होत होते. हा विषाणू प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरला.
7 / 9
२० डिसेंबरपूर्वी नोंदवण्यात आलेली सर्व ८ प्रकरणे मार्केटच्या पश्चिमेकडील भागातील होती, असे संशोधनात म्हटले आहे. या भागात जनावरांचीही विक्री होते. संशोधनानुसार, अशी ५ दुकाने होती जिथे प्राणी जिवंत किंवा कापून विकले जात होते आणि असे मानले जाते की येथून कोरोना विषाणू माणसांमध्ये पसरला.
8 / 9
संशोधनाचे सह-लेखक क्रिस्टन अँडरसन म्हणाले की ही स्टोअर शोधणे खूप खास आहे. आणखी एक सह-लेखक, अमेरिकन शास्त्रज्ञ मायकेल व्होरोबे यांनी सांगितले की या प्रकरणांच्या तपासणीत एक असामान्य पॅटर्न उघड झाले जे अतिशय स्पष्ट होता.
9 / 9
संशोधकांनी वुहान मार्केटशी कोणताही संबंध नसलेल्या लोकांची आणि वुहान मार्केटमध्ये काम करणाऱ्या किंवा त्याजवळ राहणाऱ्या लोकांची प्रकरणांची तपासणी केली. त्यात हा विषाणू प्रथम तेथे काम करणाऱ्या लोकांमध्ये पसरला, त्यानंतर तो स्थानिक लोकांमध्ये सर्वत्र पसरू लागला, असे दिसून आले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनAmericaअमेरिका