शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus In China: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर! पुतियान शहर सील, प्रवासावरही कडक निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 11:45 AM

1 / 9
चीनमध्ये कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशाच्या फुजियान प्रांतातील पुतियान शहरात कोरोनाचे २० नवे रुग्ण आढळून आले आहेत.
2 / 9
पुतियान शहरातील नागरिकांना इतर शहरांमध्ये जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शहराच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. इतर शहरांमध्ये कोरोना पसरणार याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
3 / 9
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण पुतियान शहरात आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. डेल्टा व्हेरिअंटमुळे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची दाट शक्यता होती. त्यावर जुलै महिन्यात प्रशासनानं कडक निर्बंध लादून नियंत्रण मिळवलं होतं.
4 / 9
पण आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनानं डोकं वर काढलं आहे. सिंगापूरहून गेल्याच आठवड्यात चीनमध्ये परतलेल्या नागरिकांमध्ये कोरोना विषाणू सापडल्याची माहिती समोर आली आहे.
5 / 9
संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आयसोलेट करण्यात आलं आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. शेकडो जणांना आयसोलेट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
6 / 9
कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये १० आणि १२ वर्षाच्या दोन मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. ज्या जियानयू गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. ते संपूर्ण गाव सील करण्यात आलं आहे.
7 / 9
कोरोना रुग्ण आढळून आलेल्या शहरात प्रशासनानं पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. तसंच नागरिकांच्या प्रवासावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. शहरातील इनडोअर कार्यक्रम, संग्रहालयं आणि सिनेमागृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
8 / 9
पुतियान शहराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील बस सेवा देखील पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. पुतियान शहरातील चित्रपटगृह, कार्ड रुम, जीम, पर्यटन स्थळं आणि इतर सुविधा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेस्टॉरंट आणि सुपरमार्केटवरही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
9 / 9
पुतियान शहरात एक आरोग्य पथक तैनात करण्यात आलं असून कोरोना प्रकरणांची जीनोम सीक्वेसिंग करण्यात येत आहे. यातूनच कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा उद्रेक होत असल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे चीन प्रशासन सतर्क झालं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन