शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: जैविक हत्यार म्हणून COVID 19 चा वापर झाला?; US च्या गुप्तचर यंत्रणेचा धक्कादायक रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 11:46 AM

1 / 10
जगभरात कोरोना व्हायरसनं(Covid 19) हाहाकार माजवला आहे. कोरोना जगात येऊन २ वर्ष उलटली. परंतु अद्यापही या व्हायरसचं ऑरिजन काय आहे? कुठल्या लॅबमधून लीक झाला की जैविक हत्यार म्हणून या व्हायरसचा वापर करण्यात आला? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
2 / 10
कोरोना व्हायरसबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. आजही हे कोडं सुटलेले नाही. आता अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी शुक्रवारी कदाचित कधीही कोविड १९ च्या ऑरिजनचा ठावठिकाणा लागू शकणार नाही असं म्हटल्याने खंत व्यक्त करण्यात येत आहे.
3 / 10
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी ऑरिजनबाबत सविस्तर रिपोर्ट जारी केला आहे. त्यात कोरोना व्हायरस एका प्राण्याच्या माध्यमातून मानवी शरीरात पोहचला की, कुठल्या लॅबमधून लीक झाला. ऑफिस ऑफ द US डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिंजेंस(ODNI) हा रिपोर्ट सार्वजनिक केला आहे.
4 / 10
या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, SARS COV 2 मानवी शरीराला कसं संक्रमित केले? त्यासाठी व्हायरस नॅच्युरल ऑरिजन आणि लॅबमध्ये लीक होणं या दोन्हीही कल्पना आहेत. परंतु या दोन्ही बहुतांश काय असू शकेल याबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत नाही.
5 / 10
या रिपोर्टमध्ये हा दावाही फेटाळला आहे ज्यात कोरोना व्हायरसचा वापर एक जैविक हत्यार म्हणून करण्यात आला असं म्हटलं गेलं. हा दावा करणारे वुहान इंन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी(Wuhun Institute of Virology) मध्ये कधी गेले नाहीत. हा अपप्रचारही केला जाऊ शकतो असं सांगितले आहे.
6 / 10
शुक्रवारी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये ९० दिवसांचा आढावा घेतल्यानंतर एक अपडेट वर्जन आणलं आहे. हा रिपोर्ट सर्वात आधी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन(Joe Biden) यांनी ऑगस्टमध्ये जारी केला होता. त्यावेळी कोरोना पसरवण्यासाठी चीनला जबाबदार धरण्यात येत होते. चीनला दोषी ठरवावं अशी मागणी होत होती.
7 / 10
हा रिपोर्ट प्रकाशित झाल्यानंतर चीनने यावर टीकास्त्र सोडलं आहे. वॉश्गिंटनमधील चीन राजदूताचे प्रवक्ते लियू पेंग्यू यांनी ईमेलद्वारे निवेदन दिलं आहे. कोविड १९ ऑरिजनची माहिती काढण्यासाठी वैज्ञानिकांऐवजी गुप्तचर यंत्रणेवर भरवसा ठेवणं हे अमेरिकेचं पाऊल राजकीय आहे.
8 / 10
केवळ विज्ञानाच्या आधारे मूळ अभ्यास कमकुवत करणं आणि व्हायरस ऑरिजनचा शोध घेणाऱ्या जागतिक प्रयत्नांमध्ये बाधा घालण्याचा हा प्रकार आहे. चीनने यापूर्वीही कोविड रिपोर्ट आणि वुहान लॅबबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नावर उत्तरं देत त्याचा निषेध केला होता.
9 / 10
कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला.
10 / 10
यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. जगभरातील अनेक देशात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला. कोविड १९ मुळं लाखो लोकांचे प्राण गेले. भारतालाही कोरोनाचा मोठा फटका बसला.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या