शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गिफ्ट देण्यासाठी आलेला सांताक्लॉज निघाला कोरोना पॉझिटीव्ह!; १५७ जण बाधित, १८ जणांचा मृत्यू

By मोरेश्वर येरम | Published: December 27, 2020 12:01 PM

1 / 5
एका 'वृद्धाश्रमा'मध्ये कोरोना बाधित सांताक्लॉज आल्यामुळे या ठिकाणच्या १२१ लोक आणि ३६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यानंतर कोरोना बाधित झालेल्यांपैकी १८ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. बेल्जियममध्ये ही घटना घडलीय. (प्राधिनिधीक फोटो)
2 / 5
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, दोन आठवड्यांपूर्वी एक सांताक्लॉज आपल्या काही सहकाऱ्यांसोबत बेल्जियमच्या एन्टवर्प येथील 'वृद्धाश्रमा'मध्ये पोहोचले होते. त्यानंतर वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं सांताक्लॉजच कोरोनाच्या प्रसाराचं कारण ठरल्याचं निष्पन्न झालं आहे.
3 / 5
२४ आणि २५ डिसेंबर रोजी या वृद्धाश्रमामधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक जण सध्या वेंटिलेटरवर आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, केअर होममध्ये आल्याच्या तीन दिवसांनंतर सांताक्लॉज पॉझिटीव्ह आढळला.
4 / 5
स्थानिक महापौर विम केअर्स यांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. पुढील १० दिवस आणखी कठीण असतील, असंही ते पुढे म्हणाले. वृद्धाश्रमामध्ये सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन झाल्याचं महापौरांनी याआधी सांगितलं होतं. पण या कार्यक्रमाची छायाचित्र समोर आल्यानंतर महापौरांनी चिंता व्यक्त केली.
5 / 5
दरम्यान, कोरोनाबाधित सांताक्लॉजमुळे ही भयानक घटना घडली असली तरी वृद्धाश्रमात पुरेसं वेंटिलेशन नसल्याच्या मुद्द्यावरही बेल्जियमचे वायरोलॉजिस्ट मार्क वेन रैन्स्ट यांनी बोट ठेवलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीय