जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांच्या बंगल्याचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 17:44 IST
1 / 8माईक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीचे मालक बिल गेट्स हे जगातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. पण त्यांच्या घराबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. 2 / 8बिल गेट्स हे वॉशिंग्टनमध्ये राहतात. त्यांचं घर डोंगर आणि नदीच्या मधोमध आहे. बिल हे 91.6 बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. अशात त्यांचं घर कसं आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.3 / 8बिल गेट्स यांचं शानदार घर अतिशय सुंदर अशा लोकेशनवर आहे. बिल गेट्स यांचं घर वॉशिंग्टनच्या नदी किनारी आहे. आणि आजूबाजूला मोठे डॊंगर आहेत. या घराची किंमत 124 मिलियन डॉलर इतकी सांगितली जाते.4 / 8गेट्स यांचं घर तब्बल ६६ हजार स्क्वेअर फूटाच्या परिसरात पसरलं असून हे घर तयार करण्यासाठी तब्बल ७ वर्ष लागले होते.5 / 8या बंगल्यात एक भला मोठ्ठा डायनिंग हॉल असून या 2300 स्क्वेअर फूटाच्या हॉलमध्ये 150 लोक जेवणासाठी बसू शकतात. तर 200 लोक कॉकटेल डिनरसाठी उभे राहू शकतात. 6 / 8या घरात एक मोठा जिम असून २५०० स्क्वेअर फूटाच्या परिसरात जिम आहे. या बंगल्यात ७ बेडरूम, २४ बाथरूम, १ किचन, १ स्विमिंग पूल, २३०० स्क्वेअर फूटाचा डायनिंग हॉल आहे.7 / 8या बंगल्यात १५०० स्क्वेअर फूटचं एक थिएटरही आहे. ज्यात साधारण २० लोक एकत्र बसू शकतात. 8 / 8यासोबत एक भली मोठी लायब्ररी सुद्धा या घरात आहे. ती बनवण्यासाठी तब्बल ३० मिलियन डॉलर इतका खर्च लागला. म्हणजे १९० कोटी रूपये.