Declaring support to Donald Trump rapper lil wayne; model girlfriend did breakup
ट्रम्पना पाठिंबा जाहीर करणे सुप्रसिद्ध रॅपरला भोवले; मॉडेल गर्लफ्रेंडने ब्रेकअपच केले By हेमंत बावकर | Published: November 05, 2020 1:55 PM1 / 11अमेरिकेचे प्रसिद्ध रॅपर लिल वेन याने नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्ट करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला. वेन याचे हे वागणे त्याची गर्लफ्रेंडला पटले नाही. रागाच्या भरात तिने वेनशी ब्रेकअप करून टाकले आहे. 2 / 1129 ऑक्टोबरला वेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. राष्ट्राध्यक्षांच्या प्लॅटिनम योजनेबाबत दोघांनी चर्चा केली होती. या योजनेतून कृष्णवर्णीय समाजासाठी 500 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करण्यात येणार आहे. ट्रम्प आणि वेन यांच्या भेटीचे फोटो खूप व्हायरल झाले होते. 3 / 11यानंतर वेनची मॉडेल गर्लफ्रेंड डेनिस हिने वेनला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो करून टाकले होते. एवढेच नाही तर तिने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटही डिलिट केले. 4 / 11अकाऊंट डिलिट करण्य़ापूर्वी डेनिसने एक स्टोरी लिहिली होती. यामध्ये तिने लिहीले की कधी कधी प्रेमच पुरेसे नसते. यानंतरच त्यांच्या दोघांच्या ब्रेकअप झाल्याचे अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. 5 / 1134 वर्षीय डेनिस ही प्लस साईज मॉडेल आहे. ती कुवैत आणि पुओर्तो रिको देशांशी संबंधित आहे. मात्र, तिचा जन्म अमेरिकेच्या मियामीमध्ये झाला होता. 6 / 112014 मध्य़े डेनिस पहिल्यांदा प्लस साईज मॉडेल बनली होती. तिने न्य़ूयॉर्क फॅशन वीकमध्ये अनेक वॉक केले होते. तसेच तीने अनेक प्रसिद्ध हस्तींसोबतही काम केले आहे. यामध्ये डिझायनर लिलि पुलित्झर आणि लेन ब्रायन्ट यांचे फॅशन कॅम्पेनही आहे. 7 / 112014 मध्य़े डेनिस पहिल्यांदा प्लस साईज मॉडेल बनली होती. तिने न्य़ूयॉर्क फॅशन वीकमध्ये अनेक वॉक केले होते. तसेच तीने अनेक प्रसिद्ध हस्तींसोबतही काम केले आहे. यामध्ये डिझायनर लिलि पुलित्झर आणि लेन ब्रायन्ट यांचे फॅशन कॅम्पेनही आहे. 8 / 11एका रिपोर्टनुसार डेनिसने या वर्षाच्या सुरुवातीलाच वेनला डेट करणे सुरु केले होते. यानंतर त्यांनी सोशल मीडियात अनेक फोटो शेअर केले होते. रॅपर वेन यानेही सोशल मीडियामध्ये तिच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. 9 / 11लिल वेन याच्या आधीही काही कृष्णवर्णीय कलाकारांनी ट्रम्पना सपोर्ट केला आहे. यामध्ये प्रसिद्ध रॅपर सेंट आणि किम कार्दाशिअन हिचा पती आणि म्युझिक आर्टिस्ट केनी वेस्ट हे देखील आहेत. 10 / 11अमेरिकेच्या निवडणुकीत सेलिब्रिटिंमध्ये दोन गट पहायला मिळाले आहेत. 11 / 11हॉलिवूड सुपरस्टार जेनिफर एनिस्टन, ब्रैड पिट, रॉबर्ट डी नीरो, लेडी गागा आणि मॉर्गन फ्रीमेन सारख्या अनेक स्टार्सनी ज्यो बायडन यांना पाठिंबा दिला होता. तर काही हॉलिवूडच्या सिताऱ्यांनी ट्र्म्प यांना समर्थन दिले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications