शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात खोल स्विमिंग पुलामध्ये वसलंय अख्ख शहर, पाहा फोटोज...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 1:12 PM

1 / 10
जगात अनेक ठिकाणी विविध आकाराचे आणि लहान-मोठे स्विमिंग पूल आहेत. पण, जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल दुबईमध्ये आहे. या स्विमिंग पुलाची खास बाब म्हणजे, या स्विमिंग पुलाच्या तळाशी एक अख्ख शहर वसलेलं आहे.
2 / 10
या जगातील सर्वात खोल स्विमिंग पुलाच्या तळाशी जुन्या कार, एक अपार्टमेंट, एक एक्सरसाइज बाइक आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत. चला तर मग जाणून घेउया या स्विमिंग पुलाबद्दल
3 / 10
मिररच्या रिपोर्टनुसार, दुबईमधील डीप डाइव्ह दुबई नावाचा स्विमिंग पूल 60 मीटर खोल असून, या पुलाचे नाव गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये दाखल आहे.
4 / 10
मागच्याच आठवड्यात टिकटॉक यूजर अब्दुल्ला अलसेनामीने या पुलाच्या आतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसेच, एका व्हिडिओ सीरिजच्या माध्यमातून पुलाच्या आतील दृष्य दाखवले आहे.
5 / 10
अब्दुल्ला आणि त्याची टीम जेव्हा स्विमिंग पुलाच्या आत गेले, तेवहा पुलात विविध वस्तु दिसल्या. यात जुन्या कार, एटीएम मशीन, खेळण्यासाठी काही गेम्स आणि एक घरदेखील आहे.
6 / 10
पुलाच्या आत असलेल्या इमारतीवर काही खिडक्याही लावलेल्या आहेत. एका क्लिपद्वारे एक व्यक्ती स्पिन बाइकचा वापर करत असलेला दिसत आहे.
7 / 10
या पुलातील अपार्टमेंटच्या आत विजिटर्ससाठी एक 'बाथरूम'देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डीप डाइव्ह दुबईमध्ये 14 मिलियन लीटर पाणी आहे.
8 / 10
दुबईतील या पुलाला या वर्षी जून महिन्यात सुरू करण्यात आले असून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये या पुलाची नोंद आहे.
9 / 10
गिनीज बुकच्या वेबसाइटनुसार, पुलामध्ये आवाज आणि मूड लायटिंग सिस्टीमसोबतच एक फिल्टरेशन सिस्टीमदेखील आहे.
10 / 10
ही सिस्टीम अमेरिकेतील NASA ने विकसित केलेली टेक्नीक आहे. या प्रचंड मोठ्या स्विमिंग पुलमध्ये स्कूबा डायविंग आणि फ्री डायविंगदेखील करता येते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयWaterपाणीDubaiदुबई