शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनमध्ये जिनपिंगविरोधात असंतोष उफाळला, देशाला बर्बाद केल्याचा आरोप झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 8:20 PM

1 / 7
पहिल्यांदा कोरोना विषाणूचा फैलाव आणि नंतर भारतासह इतर देशांसोबत उकरून काढलेला वाद यामुळे सध्या जगभरात चीनविरोधात नाराजी वाढत आहे. दरम्यान, या परिस्थितीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरोधात आता वातावरण तापू लागले आहे.
2 / 7
चीनमधील प्रमुख सेंट्रल पार्टी स्कूलच्या माजी प्राध्यापकांनी आता राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पार्टी स्कूलमधील लोकशाही राजकारण या विषयाच्या प्राध्यापक राहिलेल्या काई शिया यांनी हे आरोप केले आहेत. जिनपिंग यांना आता त्यांच्याच पक्षामधून विरोधाचा सामना करावा लागत आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
3 / 7
द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीती काई शिया यांनी शी जिनपिंग यांच्यावर आरोप केला की, ते आपल्याच देशाला उद्ध्वस्त करत आहेत. जिनपिंग हे चीनला विनाशाच्या दिशेने घेऊन जात आहेत, असे काई शिया यांनी म्हटले आहे.
4 / 7
माजी प्राध्यापक असलेल्या काई शिया यांचे म्हणणे आहे की, चीनमधील सत्ताधारी असलेल्या कम्युनिस्ट पक्षामधून अनेक लोक बाहेर पडू इच्छित आहेत. दरम्यान, सोमवारी एक ऑडिओ लीक झाल्यानंतर काई शिया यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या ऑडिओमध्ये काई शिया जिनपिंग यांच्यावर टीका करत असल्याचे ऐकू येत होते.
5 / 7
दरम्यान चीनच्या सेंट्रल पार्टी स्कूलने याबाबत आपले म्हणणे मांडले आहे. त्यात म्हटले आहे की, काही शिया या १९९२ पासून प्राध्यापक होत्या. त्यांच्या वक्तव्यामुळे देशाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. मात्र काई शिया यांनी पक्षातून हकालपट्टी झाल्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
6 / 7
शी जिनपिंग हे चीनला जगाविरोधात का उभे करत आहेत, या प्रश्नाचे उत्तर देताना काई शिया यांनी सांगितले की, जिनपिंग यांच्या शासनकाळात चिनी कम्युनिस्ट पक्ष देशाच्या विकासासाठी काम करत नाही आहे. तर ते विकासामध्ये अडथळा ठरत आहेत. पक्षातून बाहेर जाण्याची इच्छा असणाऱ्यांपैकी मी एकटी नाही. मी तर अनेक वर्षांपूर्वीच हा पक्ष सोडण्याची मानसिक तयारी केली होती.
7 / 7
दरम्यान, चीनला जगाचा शत्रू बनण्यासाठी काई शिया यांनी जिनपिंग हेच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, पक्षात मोठ्या प्रमाणात विरोध असूनही लोक त्यांच्याविरोधात बोलण्यासाठी कचरतात कारण आपला राजकीय बदला घेतला जाईल, याची त्यांना भीती वाटते. तसेच आपल्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागू शकतो, याची चिंता त्यांना सतावत असते. जिनपिंग यांची चौकशी करणारा कुणी नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अनेक चुका झाल्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात झालेली चूक त्यापैकीच आहे, असे त्या म्हणाल्या.
टॅग्स :chinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय