DNA TEST: गमती गमतीमध्ये मुलाची DNA टेस्ट केली, त्यातून धक्कादायक माहिती समोर आली, आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 15:31 IST
1 / 8अमेरिकेमध्ये आयव्हीएफदरम्यान Fusion मध्ये झालेल्या चुकीने एका व्यक्तीला चांगलेच अडचणीत आणले आहे. १२ वर्षांनंतर या व्यक्तीने जेव्हा गमती गमतीमध्ये मुलाची DNA चाचणी केली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. आता या पीडित व्यक्तीने संबंधित क्लिनीकविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. 2 / 8अमेरिकेतील उटाह येथील डोना आणि वन्नेर जॉन्सन या जोडप्यासोबत जीवन बदलून टाकणारी ही घटना घडली आहे. दोन मुलग्यांचे आई-वडील असलेल्या या जोडप्यासमोर १२ वर्षांनंतर त्यांच्या मुलाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. वन्नेर यांनी जेव्हा गमतीने मुलाची डीएनए चाचणी केली तेव्हा तो त्यांचा मुलगा नसल्याचे समोर आले. 3 / 8Nzherald या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार डोना आणि वन्नेर जॉन्सन हे आधीपासूनच एका मुलाचे पालक होते. त्यांना दुसरा मुलगा हवा होता. त्यासाठी २००७ मध्ये आयव्हीएफच्या माध्यमातून त्यांनी दुसऱ्यांदा गर्भधारणा केली होती. यावेळीही त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती. 4 / 8डोना आणि वन्नेर जॉन्सन यांचे कुटुंब पूर्ण झाले. त्यानंतर ते एका सुखी कुटुंबाप्रमाणे जगत होते. मात्र गमतीमध्ये केलेल्या एका डीएनए चाचणीने त्यांच्या सर्व आनंदावर विरजण टाकले. 5 / 8त्याचे झाले असे की १२ वर्षांपूर्वी वन्नेर यांच्या मुलग्याचा जन्म हा आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झाला होता. मात्र जेव्हा अहवाल समोर आला. तेव्हा समजले की, आयव्हीएफच्या प्रक्रियेसाठी कुण्या अन्य व्यक्तीचे शुक्राणू घेण्यात आले होते. हा रिपोर्ट समोर आल्यावर या जोडप्याने जिथून आयव्हीएफ केली होती त्या क्लिनिकविरोधात खटला दाखल केला आहे. 6 / 8ABC4 या संकेतस्थळाशी बोलताना वन्नेर यांनी सांगितले की, डीएनए टेस्ट रिपो्र्टमध्ये आईच्या नावासमोर डोना आणि वडिलांच्या नावासमोर अननोन असा उल्लेख आहे. हे पाहून मला मोठा धक्का बसला. 7 / 8तेव्हा याबाबत अधिक माहिती घेतली तेव्हा एक फ्युजनमध्ये गडबड झाल्याचा आणि डोनाच्या एकचे फ्युजन तिच्या पतीच्या स्पर्मसोबत न होता अन्य कुण्या व्यक्तीच्या स्पर्मसोबत झाल्याचे समोर आले. 8 / 8मात्र ही बाब समोर आल्यावर डोना आणि वन्नेर यांना धक्का बसला आहे. त्यांनी याबाबत कोर्टात धाव घेतली आहे. तसेच त्यांनी ही बाब त्यांच्या मुलाला एक वर्षानंतर सांगितली. तसेच त्याच्या जैविक पित्याचाही शोध सुरू केला आहे.