ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकताच तीन देशांचा दौरा करुन आज भारतात परतले. पंतप्रधान मोदींनी पोर्तुगालपासून दौ-याला सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी अमेरिकेचा दौरा केला. नेदरलॅण्डला भेट त्यांनी दौ-याची सांगता केली. भारत आणि नेदरलँण्डमध्ये गेल्या 70 वर्षापासून राजकीय संबंध असून मोदींच्य दौ-याच्या निमित्ताने यावर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. यावेळी एक गोष्ट मात्र अशी घडली जिचा राजकारणाशी अजिबात संबंध नाही. ते म्हणजे नेदरलँण्डचे पंतप्रधान मार्क रुट यांनी केलेलं ट्विट. पंतप्रधान मोदींनी नेदरलँण्डच्या दौ-यावेळी उत्साहात डच भाषेत अनेक ट्विट केले. या ट्विटना मार्क रुट यांनीदेखील हिंदीत उत्तर दिलं. मात्र त्यांच्या हिंदीमध्ये थोडी गफलत झाली आणि ट्विटरकरांना तेवढीच संधी मिळाली. पंतप्रधान मार्क रुट यांनी हिंजी भाषेत ट्विट केलं खरं, पण त्यांनी शब्दांमध्ये अंतर न ठेवता सलग वाक्य लिहून टाकलं. नीदरलैंड्समेंआपकास्वागतहै @narendramodi भारतऔरनेदेरलैंड्सके 70 सालकेद्विपक्षीयरिश्तेकेसाथमैहमारीबैठककेलिएबहुतउत्सुकहूं— Minister-president (@MinPres) June 27, 2017""नेदरलँण्डमध्ये आपलं स्वागत आहे. भारत आणि नेदरलँण्डचे 70 वर्षाचे राजनयिक संबंध असून आपल्या भेटीसाठी मी उत्सुक आहे"", असं ट्विट मार्क रुट यांनी केलं होतं. मार्क रुट यांचं हे ट्विट भलतंच व्हायरल झालं आणि तब्बल पाच हजार जणांनी हे ट्विट रिट्विट केलं. 11 हजाराहून जास्त जणांनी हे ट्विट लाईक केलं आहे. कमेंटचा तर अक्षरक्ष: पाऊसच पडत आहे. मार्क रुट यांच्या या ट्विटला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. ट्विटरकरांनी या ट्विटची चांगलीच मजा घेतली. अनेकांनी मात्र त्यांनी हिंदीत ट्विट केल्याबद्दल कौतुकही केलं. पंतप्रधान मोदींची भेट झाल्यानंतर मार्क रुट यांनी पुन्हा एकदा हिंदीत ट्विट केलं. मात्र यावेळी त्यांचं हिंदी अचूक होतं. नीदरलैंड्स में पधारने के लिए धन्यवाद @narendramodi हम आने वाले वर्षों में हमारे सतत सहयोग के लिए तत्पर हैं। pic.twitter.com/bi9EzwQQTt— Minister-president (@MinPres) June 27, 2017मार्क रुट यांनी हिंदीत ट्विट करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2015 मध्ये मार्क रुट जेव्हा भारतात आले होते तेव्हा मोदींनी ट्विट करत त्यांचं स्वागत केलं होतं, या ट्विटला त्यांनी हिंदीत उत्तर दिलं होतं.