Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्ट अमेरिकेच्याच अंगलट आला; सैन्य विमानाचा वापर महागात पडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 08:52 IST
1 / 8डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरित यांच्यावर कठोर पाऊले उचलली. ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिका मॅक्सिको यांच्या सीमेवर कसून चौकशी सुरू करत हद्दपारीची प्रक्रिया वेगाने झाली. पदभार स्वीकारल्यानंतर १ महिन्यातच ३७,६६० स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्यात आले.2 / 8अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या या स्थलांतरितांना त्यांच्या त्यांच्या देशात पाठवण्यासाठी अमेरिकेच्या सैन्याची विमाने पाठवण्यात आली. भारतातही अमेरिकेने ३ सैन्य विमान पाठवली. आता यावर होणारा खर्च पाहता स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी सैन्याच्या विमानाचा वापर थांबवण्यात आला आहे. 3 / 8वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, ट्रम्प प्रशासनाने देशात राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या देशात पाठवण्यासाठी सैन्याचा विमानाचा वापर थांबवला आहे. स्थलांतरितांना सैन्य विमानाने पाठवण्याची योजना महागडी आणि गैर व्यावहारिक ठरली. प्रशासनाने आतापर्यंत देशातून बाहेर काढलेल्या लोकांचे आकडे जारी केले नाहीत. 4 / 8सरकारी आकडेवारी जाहीर नसल्याने किती लोकांना अमेरिकेच्या देशांतर्गत सुरक्षा यंत्रणेने देशात पकडले आणि किती जणांना सीमेवरच ताब्यात घेऊन बाहेर पाठवण्यात आले. फ्लाईट ट्रॅकिंग डेटानुसार, अमेरिकन सरकारने जवळपास ३० उड्डाण सी १७ विमानाने आणि १२ उड्डाणे सी १३० विमानाने घेत स्थलांतरितांना देशाबाहेर पाठवले. 5 / 8या उड्डाणाच्या माध्यमातून बेकायदेशीर स्थलांतरितांना भारत, ग्वाटेमाला, इक्वाडोर, पेरू, होंडुरास, पनामा या ६ देशात परत पाठवण्यात आले. त्याशिवाय काही स्थलांतरितांना ग्वांतानामो बे इथेही पाठवले. यावेळी सैन्याच्या विमानांनी फार लांबचा प्रवास केला. कमी स्थलांतरितांना घेऊन जाण्यात आले आणि नागरी विमानाच्या तुलनेने अधिकचा खर्चही उचलावा लागला6 / 8रिपोर्टनुसार, भारतातील बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी अमेरिकेने ३ विमाने पाठवली. त्यासाठी जवळपास ३ मिलियन डॉलर(३० कोटी) खर्च आला. काही उड्डाणात केवळ १२ लोकांना ग्वांतानामो बे या देशात पाठवले. ज्यात प्रतिव्यक्ती कमीत कमी २० हजार डॉलर खर्च झाला. अमेरिकेने आतापर्यंत ३ उड्डाणातून ३३२ स्थलांतरितांना भारतात पाठवलं आहे. ज्यावर प्रतिव्यक्ती २७,१०८ रूपये खर्च आला आहे.7 / 8सरकारी आकडेवारीनुसार, ICE च्या स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या उड्डाणाची सरासरी किंमत ८५०० डॉलर प्रति उड्डाण होती. परंतु आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी याचा खर्च किमान १७ हजार डॉलर प्रति तास झाला. अवजड सामान आणि सैन्य वाहतुकीसाठी डिझाईन केलेल्या सी १७ विमानाचा खर्च प्रति उड्डाण २८५०० डॉलरपर्यंत झाला आहे.8 / 8दरम्यान, C-17 विमानाने मॅक्सिकन हवाई क्षेत्राचा वापर टाळून खूप लांबचा पल्ला गाठला. ज्यामुळे मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील उड्डाणाचा वेळ वाढला. काही लॅटिन अमेरिकन देशात, ज्यात मॅक्सिकोचा समावेश आहे. त्यांनी अमेरिकन सैन्याच्या विमानांना उतरण्याची परवानगी देणे टाळले आणि व्यावसायिक विमानातून स्थलांतरितांना पाठवावे लागले.