शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डोनाल्ड ट्रम्प सर्वात सुरक्षित बंकरमध्ये; अणुबॉम्ब हल्लाही ठरेल निष्प्रभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 11:11 AM

1 / 8
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत 36 लाख 42 हजार 066 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यापैकी 2 लाख 52 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11 लाख 93 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील 24 तासांमध्ये 78377 नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर 3,877 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
2 / 8
अमेरिकेतील 75हून अधिक शहरांत निदर्शने - अमेरिकेच्या 75 हजारहून अधिक शहरांमध्ये निदर्शने झाली आहेत. जी शहरं कोरोना व्हायरसच्या हाहाकारामुळे पूर्णपणे बंद होते आणि रस्ते ओस पडले होते. तेथे आता संतप्त जमाव रस्त्यावर उतरून निदर्शन करत आहे.
3 / 8
आतापर्यंत 4,100 जणांना अटक - अमेरिकेत दंगलीच्या आरोपाखाली 4,100 जणांना अटक करण्या आली आहे. यांपैकी अधिकांश दंगेखोरांना तात्पुरत्या कारागृहांमध्ये ठेवण्यात आले आहे. जागोजागी नॅशनल गार्डचे जवान गस्त घालत आहेत.
4 / 8
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उसळलेल्या हिंसक आंदोलनावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात लष्कराला पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
5 / 8
व्हाइट हाऊसजवळ निदर्शन करत असलेल्या जमावाने तेथील कचऱ्याला आग लावली आणि पोलिसांनाही धक्काबुक्की केली. येथील परिस्थिती एवढी चिघळली, की तेथे तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजन्ट्स राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये असलेल्या संरक्षण बंकरमध्ये घेऊन गेले. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी व्हाइट हाऊसजवळील निदर्शकांना हुसकावण्यात आले.
6 / 8
लोकांची गर्दी पाहून डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षेच्या कारणाने लगेच गुप्त बंकरमध्ये नेण्यात आलं होतं. हा बंकर इमरजन्सीमध्ये राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी वापरला जातो.
7 / 8
हा बंकर इतका शक्तिशाली आहे की या बंकरवर रॉकेट, क्षेपणास्त्र वैगरे सोडा अणुबॉम्बने हल्ला केला तरीदेखील बंकरमध्ये असणाऱ्या व्यक्तींना काहीही होणार नाही.
8 / 8
या बंकरमध्ये अनेक गुप्त रस्ते आहेत, ज्याद्वारे अमेरिकन अध्यक्ष कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कोठेही जाऊ शकतील. तसेच या बोगद्याद्वारे ते कोणत्याही विभागाच्या कार्यालयांमध्ये पोहोचू शकतात.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाnuclear warअणुयुद्ध