शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Donald Trump : ट्रम्प यांच्यावरील हल्लाच अमेरिकेतली निवडणुकीचा ठरला टर्निंग पॉइंट; तिथूनच उलटफेर सुरु झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 3:10 PM

1 / 11
गेल्या काही दिवसापासून संपूर्ण जगाचं अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीकडे लक्ष लागले होते. आता या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालांमधून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढील अध्यक्ष असतील हे स्पष्ट झाले आहे.
2 / 11
अटीतटीची लढत असल्याचे सांगण्यात येत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच जोरदार मुसंडी मारत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर विजयी आघाडी घेतली. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्रपती म्हणून जानेवारी महिन्यात शपथ घेतील.
3 / 11
अमेरिकेत गेल्या काही दिवसापासून निवडणुकीसाठी प्रचारमोहिम सुरू होत्या. सुरुवातीला ट्रम्प आणि कमला हॅरिस या दोन्ही उमेदवारांचे पारडे जड होते. पण, प्रचार मोहिमेवेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. हा गोळीबारच ट्रम्प यांच्या निवडणुकीसाठी टर्निंग पॉइंट ठरला आहे.
4 / 11
२० वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रुक्सने पेनसिल्व्हेनियाच्या बटलर पार्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली. एआर स्टाईल 556 रायफलमधून झाडलेल्या गोळीतून ट्रम्प बचावले पण त्यांच्या कानाला दुखापत झाली. ही घटना काही सेकंदाची होती पण या घटनेने अमेरिकेतली राजकारणच बदलून टाकले आहे.
5 / 11
या हल्ल्यावेळी जर ट्रम्प यांनी आपलं डोक उजवीकडे वळवले नसते तर त्यांना धोका झाला असता, त्यांनी 0.05 सेकंदाच्या अंतराने त्यांनी डोक फिरवले. यामुळे गोळी डोक्याऐवजी उजव्या कानावरून गेली.
6 / 11
गोळीचा आवाज आला आणि गोळी कानाला घासून गेली. ट्रम्प यांनी त्यांच्या उजव्या कानाला हात लावला तेव्हा त्यांच्या जखम झाल्याचे लक्षात आले. यावेळी ते लगेच खाली वाकले, आणि दुसऱ्यांदा त्यांच्यावर हल्ला झाला.
7 / 11
या हल्ल्यातून डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले. पण निवडणुकीतील प्रचार त्यांनी थांबवला नाही. त्यांनी उपचार घेऊन पुन्हा प्रचार सुरू केला.
8 / 11
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी होण्यासाठी ५३८ इलेक्टोरल मतांपैकी २७० मतं मिळवणं आवश्यक असतं. दरम्यान आतापर्यंत ४८१ निकाल हाती आले असून, त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना २६७ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत.
9 / 11
तर कमला हॅरिस यांना २१४ इलेक्टोरल मतं मिळाली आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प हे विस्कॉसिन, मिशिगन, अॅरिझोना, नेवाडा आणि अलास्का या राज्यांमध्ये आघाडीवर असल्याने ते तीनशेपार मजल मारतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
10 / 11
२०२० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र पराभवाचा धक्का बसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती.
11 / 11
तसेच त्यांनी आक्रमक प्रचार करत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीही मिळवली होती. त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस यांनी आव्हान उभं केलं होतं. मात्र अटीतटीची मानली जाणारी ही अध्यक्षीय निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी सहजपणे जिंकली. त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीत इलेक्टोरल मतांसह पॉप्युलर मतांमध्येही कमला हॅरिस यांना मात दिली आहे.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका