शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेत उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असलेल्या जेडी व्हॅन्स यांचा भारताशी काय संबंध?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 3:17 PM

1 / 7
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जेडी व्हॅन्स यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले आहे. त्यामुळे ट्रम्प जिंकले तर व्हॅन्स हे उपराष्ट्रपती असणार आहेत.
2 / 7
जेडी व्हॅन्स हे ट्रम्प यांचे टीकाकार आहेत, त्यामुळे त्यांना उपराष्ट्रपती बनवण्याचा निर्णय खूपच आश्चर्यकारक होता. तसेच, व्हॅन्स यांचे भारताशी खूप घट्ट नाते आहे. कारण भारतीय वंशाच्या अमेरिकन असलेल्या उषा व्हॅन्स यांच्याशी त्यांचे लग्न झाले आहे.
3 / 7
एक लेखक, तत्कालीन रिपब्लिकन सिनेटर आणि आता उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असलेल्या जेडी व्हॅन्स यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांची पत्नी उषा सोबत आहेत.
4 / 7
उषा व्हॅन्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. पूर्वी त्यांचे नाव उषा चिलुकुरी होते. जेडी व्हॅन्सशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव उषा व्हॅन्स झाले.
5 / 7
उषा व्हॅन्स या सॅन दिएगोच्या एका शहरात वाढल्या. कॉलेजनंतर त्यांनी येलमधून कायद्याची पदवी घेतली आणि नंतर केंब्रिज विद्यापीठातून तत्त्वज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
6 / 7
येलमधून पदवी घेल्यानंतर दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले. दोघांचे लग्न हिंदू धर्मगुरूने विधीपूर्वक लावून दिले. उषा आणि जेडी व्हॅन्स यांना तीन मुले आहेत, दोन मुलांचे नाव इवान आणि विवेक आहे, तर मुलीचे नाव मीराबेल आहे.
7 / 7
काही आठवड्यांपूर्वी उषा या वकील आणि न्यायिक लिपिक म्हणून काम करत होत्या. मात्र, आता त्या काम सोडून पतीच्या प्रचारात व्यस्त झाल्या आहेत.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प