शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ट्रम्प यांची तरुण प्रेस सेक्रेटरी, भल्या भल्यांची करते बोलती बंद, ३२ वर्षांनी मोठ्या व्यक्तीसोबत केलं लग्न, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:15 IST

1 / 5
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींबाबतही लोकांच्या मनात उत्सुकता आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनामध्ये व्हाइट हाऊसच्या नव्या प्रेस सेक्रेटरीचं पद सांभाळणाऱ्या कॅरोलिन लेविट या जगभरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
2 / 5
२७ वर्षीय कॅरोलिन लेविक ह्या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात तरुण प्रेस सेक्रेटरी ठरल्या आहेत. सोबतच त्या आपलं मत परखडपणे मांडत असल्याने त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचीही चर्चा होत आहे.
3 / 5
कॅरोलिन लेविट ह्या कुठल्याही प्रश्नावर स्पष्टपणे आपलं मत मांडतात. त्यामुळे पत्रकारांसोबत त्यांचे वाद विवादही होतात.
4 / 5
अमेरिकेच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांचा जन्म १९९७ मद्ये न्यू हॅम्पशायरमधील कुटुंबात झाला होता. जानेवारी २०२५ मध्ये त्यांनी व्हाईट हाऊसच्या ३६ व्या प्रेस सेक्रेटरी म्हणून कामकाज सांभाळले. तत्पूर्वी २०१९ मध्ये त्यांनी माध्यम आणि राज्यशास्त्र विषयात पदवी मिळवली होती. तसेच त्यांनी २०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचार अभियानामध्ये राष्ट्रीय प्रेस सचिव म्हणून काम केलं होतं.
5 / 5
दरम्यान, कॅरोलिन ह्या त्यांच्या पर्सनल लाइफमुळेही खूप चर्चेत असतात. २७ वर्षांच्या कॅरोलिन यांनी त्यांच्यापेक्षा ३२ वर्षांनी मोठ्या असलेल्या निकोलस रिकीयो यांच्यासोबत विवाह केला आहे. निकोलस हे ५९ वर्षांचे आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी त्यांनी विवाह केला होता. दरम्यान, विवाहापूर्वी जुलै २०२४ मध्ये त्यांनी मुलाला जन्म जन्म दिला. त्यातं नाव निकोलस रॉबर्ट रिको असं ठेवण्यात आलं आहे.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय