शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनानंतर चीनवर आणखी एक मोठं संकट; हजारो लोक बेघर, कोट्यावधींचे झाले नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 12:00 PM

1 / 9
चीनमधील वुहान प्रांतामधून सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे. मात्र चीन हळूहळू कोरोना व्हायरसपासून सावरत पहिल्यासारखे पूर्वपदावर येत आहे.
2 / 9
कोरोनासारख्या संकाटामधून सावरत असतानाच चीनवर आणखी एक मोठं संकट कोसळलं आहे. चीनमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक शहरातील रस्ते आणि घरं पाण्याखाली गेले आहेत.
3 / 9
दक्षिण चीनमध्ये पाऊस आणि वादळामुळे कोट्यावधी सरकारने लोकांना स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहे. तसेच या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो लोकांची घरं पाण्याखाली गेली आहे.
4 / 9
चीन सरकारने म्हटले आहे की, दक्षिण आणि मध्य चीनमधील पुरामुळे १२ जणांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तसेच लाखो लोकांना घरे सोडून जावे लागले आहे.
5 / 9
चीनच्या आपत्कालीन सेवांनी सांगितले की, या पुरामुळे आम्ही २.३० लाख लोकांना स्थलांतरित केले आहे. हे सर्व लोक बुडलेल्या भागात राहत होते. आता हे सर्व लोकं मदत छावण्यांमध्ये राहत असल्याचे सांगण्यात आले आहे.
6 / 9
गुआंग्सी, झुआंग, यांगशुओ, हुनान, गुईझोऊ, क्वांगटोंग, फुच्येन आणि चुआंगमध्ये पूरामुळे १३०० हून अधिक घरे पडली आहेत. तसेच प्राथमिक अंदाजानुसार, ५५० दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे ४१६१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
7 / 9
दक्षिणेकडील गुआंग्सीमध्ये आलेल्या पूरामुळे 6 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बरेच लोक बेपत्ता आहेत. त्याचप्रमाणे हुनान प्रांतात ७ जण ठार झाले आहेत आणि बरेच लोक येथे बेपत्ता आहेत.
8 / 9
या पूरामध्ये १०००हून अधिक हॉटेल बुडाली आहेत. तसेच देशातील ३० हून अधिक पर्यटन स्थळांच मोठं नुकासान झाले आहे.
9 / 9
२०१९ मध्येही चीनमध्ये आलेल्या पुरामुळे शेकडो लोकांना प्राण गमावावे लागले होते. त्याचप्रमाणे १९९८ साली देखील चीनमध्ये पावसामुळे मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर ३० लाखांहून अधिक घरं उद्धवस्त झाली होती.
टॅग्स :chinaचीनcycloneचक्रीवादळ