Elon Musk Twitter: First Twitter Now Private Jet; Elon Musk bought a plane worth 646 crores
Elon Musk Twitter: आधी Twitter आता खासगी जेट; Elon Musk यांनी खरेदी केले 646 कोटींचे विमान... By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 9:28 PM1 / 8Elon Musk Twitter: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांनी $ 44 बिलियनमध्ये मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter) खरेदी केल्यानंतर, आणखी एक मोठी खरेदी केली आहे. 2 / 8 ट्विटरच्या नवीन बॉसने स्वतःसाठी एक महागडे आणि आलिशान जेट ऑर्डर केले आहे. या खाजगी जेटची किंमत 78 मिलियन डॉलर्स किंवा सुमारे 6 अब्ज रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.3 / 8 गल्फस्ट्रीम G700 जेट ऑर्डर केले- मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटर सारख्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क खाजगी जेटचे मोठे चाहते आहेत. 4 / 8 त्यामुळेच त्यांनी त्यांच्या विमानांच्या संग्रहात एक नवीन विमान सामील केले आहे. रिपोर्टनुसार, त्यांनी स्वत:साठी गल्फस्ट्रीम G700 जेट ऑर्डर केले आहे.5 / 8 2019 मध्ये लाँच करण्यात आले-G700 हे गल्फस्ट्रीम लक्झरी आणि नवीन जेट आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये याची लॉन्चिंग झाली होती. इलॉन मस्क त्यांचा बहुतांश प्रवास खासगी जेटने करतात. 6 / 8 2018 मध्ये त्यांनी त्यांच्या G650ER जेटद्वारे सुमारे 150,000 मैलांचा प्रवास केला होता. मात्र, या नवीन जेटच्या खरेदीबाबत इलॉन मस्क किंवा त्यांच्या कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.7 / 8 19 लोकांसाठी आसनव्यवस्था-गल्फस्ट्रीम G700 त्याच्या खास वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. दरम्यान, हे विमान उडवण्यासाठी खर्चदेखील खूप जास्त आहे. लिबर्टी जेटच्या अहवालानुसार, सुमारे 400 तास उड्डाण करण्यासाठी या विमानावर $3.5 मिलियन खर्च येतो.8 / 8 या खाजगी जेटमध्ये 19 लोक बसण्याची क्षमता आहे. याची लांबी 109 फूट 10 इंच आणि उंची 25 फूट पाच इंच आहे. याची कमाल श्रेणी 7,500 नॉटिकल मैल आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications