Emotional homage to the wife, a happy moment recreated with the daughter
पत्नीला भावनिक आदरांजली, मुलीसोबत रिक्रिएट केला तो आनंदी क्षण By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 3:33 PM1 / 10पत्नी-पत्नीच्या नात्याला अधिक घट्ट करतात ती मुले. चिमुकल्यांच्या आगमनानंतर वेगळ्याच आनंदी आयुष्याला सुरूवात होती. 2 / 10सात जन्म सोबत राहणाऱ्याची शपथ घेतल्यानंतर आयुष्याची लगीनगाठ बांधली जाते. सुखी संसाराला सुरुवात होते. जेम्स अल्व्रेझ यांचंही आयुष्य आनंदी बनलं होतं. 3 / 10पण, काळाने मोठा आघात जेम्स यांच्यावर केला. पत्नी 9 महिन्यांची गरोदर असताना रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला अन् दु:खाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला. 4 / 10अपघातानंतर पत्नीच्या पोटातील बाळ वाचविण्यात डॉक्टरांना यश आलं. पण, त्यानंतर चिमुकल्या मुलीसोबतच जेम्स अल्व्रेझचं आयुष्य सुरू झालं. पत्नी गेली अन् तिची निशाणी सोडून गेली. 5 / 10अल्व्रेझनं चिमुकलीच्या पहिल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना अतिशय भावनिक फोटोशूट केलंय. पत्नीसोबतचे जुने क्षण त्याने रिक्रिएट केलेत. सोशल मीडियाही हे फोटो पाहून भावूक झाल्याचं दिसून आलं. 6 / 10वडिल जेम्स यांनी 1 वर्षाच्या अडलेन हिच्यासोबत फोटो काढताना आपली पत्नी येसिनिया एग्युलर हिचाही फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे बेबी शॉवरदरम्यान ज्या जागेवर फोटोशूट केलं होतं. तोच सीन रिक्रिएट केलाय. 7 / 10येसियानी ही मॉर्निग वॉकसाठी जात असताना तिला कारने धडक दिली, त्यावेळी ती 35 महिन्यांची प्रग्नंट होती. चिमुकल्या अडलेनच्या पहिल्या वाढदिनी आज जेम्सने त्या आठवणी जागवल्या आहेत. 8 / 10जेम्सचे हे भावनिक क्षण सोशल मीडियालाही भावूक करून गेले आहेत, त्यामुळेच ही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत चिमुकलीच्या अंगावरही गुलाबी रंगाचाच ड्रेस आहे, जो आईच्या अंगावर दिसतो. 9 / 10एडलेन आज तुम्ही आई असती तर सर्वात जास्त आनंद तिलाच झाला असता. तुझा वाढदिवस साजरा करायला ती सर्वाधिक उत्साही असती, असे कॅप्शन जेम्सने इंस्टावर दिले आहे. 10 / 10जेम्स हा मोटीव्हेशनल स्पीकर, ब्लॉगर असून त्याने अतिशय भावनिक शब्दात आठवणी जागवल्या आहेत. दुर्दैवाने ज्यादिवशी पत्नीची पुण्यतिथी असते, त्याचदिवशी मुलीचा जन्मदिवस असतो, असेही जेम्सने सांगितलंय. आणखी वाचा Subscribe to Notifications