शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अरेरेsss! अब्जाधीश महिलेसोबतचा एक KISS मंत्र्याला महागात पडला; CCTVत कैद झाल्यानं राजीनामा द्यावा लागला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 4:54 PM

1 / 10
इंग्लंडचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झालेल्या आपल्या एका KISS मुळे जबरदस्त चर्चेत आहेत. मॅट यांनी आपल्या एका जवळच्या सहकाऱ्याला किस करत कोविड-19 च्या गाइडलाइन्सचे उल्लंघन केले होते. यानंतर आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (England Gina coladangelo and minister matt hancock kiss is going viral and britain cabinet minister resigned)
2 / 10
या घटनेनंतर मॅट यांची सहकारी जिना कोलाडँगलो देखील जबरदस्त चर्चेत आहेत. जिना या अब्जाधीश आहेत. 43 वर्षीय जिना या एक बिझनेसवुमन आहेत आणि डिपार्टमेंट ऑफ हेल्थच्या अॅडव्हायझरदेखील आहेत. एवढेच नाही, तर त्या ओलिव्हर बोनास कंपनीच्या कम्युनिकेशन डायरेक्टरदेखील आहेत.
3 / 10
जिना यांचे पती ओलिवर ट्रेस या फॅशन अँड लाइफस्टायल कंपनीचे फाउंडर आहेत. याशिवाय, जिना या लॉबिंग फर्म कंपनी लूथर पँड्रागनच्या डायरेक्टर देखील आहेत. एवढेच नाही, तर त्या या कंपनीच्या एक मुख्य शेअरधारकही आहेत.
4 / 10
गेल्या वर्षी मार्च महिन्यात मॅट यांनी जिना यांना गुप्तपणे आरोग्य आणि सामाजिक देखभाल विभागात एक सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. मात्र, या पदावर त्यांना कुठल्याही प्रकारचे वेत मिळत व्हते.
5 / 10
यानंतर मॅट हॅनकॉक यांनी सप्टेंबर हमिन्यात जिना यांना डीएचएससीमध्ये Non-Executive Director म्हणूनही नियुक्त केले होते.
6 / 10
संडे टाइम्ससोबत बोलताना एका सोर्सने म्हटले होते, की मॅट एखादे मोठे पाऊल उचलण्यापूर्वी जिना यांच्याशी चर्चा करायचे. त्यांना सर्वकाही माहीत असायचे. जिनादेखील हॅनकॉक यांच्या व्हाइटहॉल ऑफिसमध्ये बराच वेळ घालवत होत्या.
7 / 10
6 मेरोजी दुपारी तीन वाजता स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभीमीवर वेस्टमिंस्टर अत्यंत बिझी असतानाच, हॅनकॉक आणि जिना किस करत होते. या घटनेबरोबरच मॅट यांच्या 15 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यावरही चर्चेला सुरुवात झाली आहे.
8 / 10
गेल्या वर्षी मार्च महिन्यात वादग्रस्त नियुक्तीनंतर जिना आणि मॅट अनेक वेळा डाउनिंग स्ट्रिट येथून सोबतच निघतांना दिसले आहेत. एवढेच नाही, तर जिना यांनी नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांसोबत गुप्त बैठकीतही भाग घेतला होता, हेही समोर आले आहे.
9 / 10
मॅट आणि जिना यांच्या या किसनंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी मॅट यांना ढोंगी म्हटले आहे. कारण त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना अनेक वेळा सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आणि मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ते स्वतःच सहकाऱ्याला किस करताना दिसले आहेत.
10 / 10
या घटनेपासूनच मॅट यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढत होता. अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
टॅग्स :Englandइंग्लंडministerमंत्रीHealthआरोग्यGovernmentसरकार