england government funded an organisation lakhs of rupees which held sex parties in clubs
या देशात 'सेक्स पार्टी'साठी सरकारकडून लाखोंचा निधी By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 12:32 PM1 / 10इंग्लंडमध्ये सेक्स पार्ट्या आयोजित करणारी कंपनी अनबेन्नेंटला सरकारकडून 36 हजार पौंड म्हणजे सुमारे 37 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. इंग्लंडच्या आर्ट्स कौन्सिलने अनबेन्नेंट कंपनीला फंडिग केले आहे. 2 / 10या निर्णयावर बर्याच लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत आणि विरोध दर्शविला आहे. सर्वसामान्यांचे टॅक्सचे पैसे असे खर्च करु नये असे विरोधकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी आर्ट्स कौन्सिल इंग्लंडचे म्हणणे आहे की, त्यांनी हा पैसा कोरोना कल्चर रिकव्हरी फंडच्या माध्यमातून दिली आहे. 3 / 10तसेच, या क्लबचे वर्णन एक क्रिएटिव्ह प्रोडक्शन कंपनी म्हणून केले आहे, ज्यामुळे ईस्ट लंडनच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल, असे आर्ट्स कौन्सिल इंग्लंडने म्हटले आहे.4 / 10दरम्यान, अनबेन्नेंटचा एक प्रसिद्ध क्लब आहे, ज्याचे नाव क्लब वेरबेटोन आहे. हा एक एलजीबीटीक्यू फ्रेंडली क्लब आहे आणि हा बीडीएसएम क्लब म्हणून प्रचलित आहे. या क्लबमध्ये येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेतली जाते.5 / 10 या क्लबमध्ये जाण्यासाठी एक खास ड्रेस कोड वापरला जातो. आनंद व्यक्त करताना क्लबच्या प्रवक्त्याने सांगितले की, या निधीमुळे आम्हाला खूप आर्थिक मदत मिळणार आहे. 6 / 10ईस्ट लंडनमध्ये उपस्थित असलेल्या या क्लबचा एक सोशल मीडिया ग्रुप देखील आहे, जेथे 5000 हून अधिक लोक सक्रिय आहेत. याशिवाय, इन्स्टाग्रामवर या क्लबचे 15 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. 7 / 10आर्ट्स कौन्सिल इंग्लंडचे म्हणणे आहे की, कोरोना कालावधीमुळे कोसळलेल्या नाईटलाइफ अर्थव्यवस्थेला ही कंपनी पुनरुज्जीवित करू शकते आणि या निधीच्या मदतीने ही कंपनी बर्याच नवीन रोजगार निर्माण करू शकते.8 / 10आर्ट्स कौन्सिल इंग्लंडच्या निवेदनात असेही म्हटले आहे की, आम्ही समजू शकतो की अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येकासाठी नसतात परंतु बहुसांस्कृतिक देश म्हणून अशा संस्थांचे संरक्षण करण्याची आपली जबाबदारी बनते तसेच मुख्य प्रवाहात येणाऱ्या समाजापेक्षा वेगळी आहे.9 / 10आर्ट्स कौन्सिल ही इंग्लंड सरकारच्या अर्थसहाय्यित एक संस्था आहे, जी डिजिटल, संस्कृती, मीडिया आणि क्रिडाशी संबंधित कलात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत करते. 1994 मध्ये या संस्थेची स्थापना झाली.10 / 10दरम्यान, आर्ट्स कौन्सिल इंग्लंडने बर्याच चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. यामध्ये द ट्रेंच, रॅचॅचर, हिलरी आणि जॅकी, बेंट, मॅन्सफिल्ड पार्क, मेट्रोलँड, बेबी मदर, कॅप्टन जॅक, ब्युटीफुल क्रिएचर अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांचा समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications