शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घटस्फोटानंतरही पतीपासून वेगळी होऊ शकत नाही पत्नी, ऑर्थोडॉक्स ज्यूंमधील विचित्र प्रथा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 4:32 PM

1 / 11
रिफका मेयर हिने 32 वर्षांची असताना रीतिरिवाजानुसार वैवाहिक जीवनात प्रवेश केला. मात्र, लग्नाच्या अडीच वर्षानंतर तिला जाणवले, की की ती तिच्या ऑर्थोडॉक्स ज्यू पतीच्या बंधनात अडकली आहे. ती एका अशा पुरुषा सोबत लग्न करून कैद झाली होती, की तो तिला बरेच वर्ष घटस्फोट देण्यासही तयार नव्हता. (England a jews woman had to wait 9 years to get a religious divorce from husband)(सांकेतिक छायाचित्र)
2 / 11
बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत रिफका म्हणाली, 'या स्थितीत व्यक्तीला प्रचंड निराश आणि एकटे असल्यासारखे वाटते. असे वाटते की आपण मोठ्याने ओरडत आहोत, परंतु आपला आवाज ऐकण्यासाठी तेथे कुणीही नाही. (सांकेतिक छायाचित्र)
3 / 11
क्रॉस-पार्टी संसद गटाचे सदस्य जोनाथन मेंडेलसोहन यांनी बीबीसीसोबत बोलताना सांगितले की, एक धार्मिक घटस्फोट घेण्यासाठी महिलेला सुमारे 10 वर्षे लागली. संपूर्ण इंग्लंडमध्ये 100 हून अधिक महिला ऑर्थोडॉक्स ज्यूंमध्ये धार्मिक विवाह बंधनात अडकल्या आहेत. ज्यू समाजात अशी अनेक प्रकरणं मी पाहिली आहेत. (सांकेतिक छायाचित्र)
4 / 11
सनातनी अथवा परंपरावादी (ऑर्थोडॉक्स) ज्यू कायद्यानुसार, घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पत्नीला तिच्या पतीकडून एक डॉक्यूमेंट घ्यावे लागते. ज्यूंमध्ये याला 'गेट' असे म्हटले जाते. याशिवाय, एखाद्या महिलेचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला असला तरी, ती त्या व्यक्तीशी विवाहित राहते. अशा प्रकारे, धार्मिक विवाहाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांना 'चेन वाइफ' असे म्हटले जाते. (सांकेतिक छायाचित्र)
5 / 11
रिफकाने तिची आपबिती सांगताना म्हटले आहे,की ती इच्छा असतानाही इतर कुण्या जोडीदारासोबत जाऊ शकत नाही. ती म्हणाली, 'आपण यात अडकल्यास, कुणालाही भेटू शकत नाही अथवा कुणालाही डेट करू शकत नाही. एवढेच नाही, तर तुम्ही वेगळे निघून पुढची वाटचालही करू शकत नाही आणि मी येथून निघून कुठेही जाऊ शकत नाही. (सांकेतिक छायाचित्र)
6 / 11
रिफकाने सांगितले, 'अशा स्थितीत, आपण कुणाशीही बोलू शकत नाही, आपल्याला कुणी मदतही करत नाही. आपण प्रचंड अस्वस्थ असतो आणि आहात आणि तुम्हाला खूप एकटे वाटते. हा अत्यंत वाईट प्रवास आहे, तो आपल्याला एकट्यालाच पूर्ण करावा लागतो. (सांकेतिक छायाचित्र)
7 / 11
नशिबाने रिफका या बंधनातून आता मुक्त झाली आहे आणि तिने गेल्या वर्षीच 'गेट' मिळविला आहे. ती लंडन येथे राहते आणि GETT नावाची एक संस्था चालवते. ही संस्था अशा महिलांना अशा प्रकारच्या समस्येतून बाहेर काढण्यास मदत करते. (सांकेतिक छायाचित्र)
8 / 11
गेट मिळाले नाही तर काय होते? पतीकडून गेट मिळाले नाही, तर महिलेच्या पुनर्विवाहावर बंदी येते. हे अव्यवहार्य मानले जाते. दुसऱ्या पुरुषासोबत मुले जन्माला घालण्याची परवानगी तिला नसते. जर एखाद्या स्त्रीने असे केलेच, तर तिच्यापासून जन्माला येणाऱ्या मुलाकडे 'मेमजर' अथवा एक अनोखे मूल म्हणून पाहिले जाते. जर एखाद्या व्यक्तीवर 'गेट' मिळवण्यासाठी दबाव टाकण्यात आला, तर ज्यूज कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये याला 'बेथ दिन', असे म्हटले जाते. असा घटस्फोट रद्द ठरवला जातो. (सांकेतिक छायाचित्र)
9 / 11
घरगुती हिंसाचारासंदर्भातील एका कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार, एखाद्या महिलेला जबरदस्ती करणे किंवा तिला नियंत्रणात ठेवणे, हा गुन्हा आहे. असे करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते आणि आरोप सिद्ध झाल्यास त्याला तुरुंगातही होऊ शकतो. या कायद्यामुळे महिलांना त्यांच्या जोडीदाराकडून धार्मिक घटस्फोट मिळाला नाही तर, अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा अधिकार मिळेल, अशी आशा आहे. (सांकेतिक छायाचित्र)
10 / 11
तथापि, ऑर्थोडॉक्स ज्यूंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका महासंघाने म्हटले आहे, की ज्यू कायद्यानुसार, शारीरिक किंवा आर्थिक छळ किंवा तुरुंगाची धमकी देऊन मिळविलेले 'गेट' हे पूर्णपणे अवैध आहे. महासंघाने एका पत्रात म्हटले आहे, 'कायदेशीर घटस्फोट मिळाला असला तरी, जोवर गेट मिळत नाही, तोवर कुठलेही कपल विवाहातच राहील. (सांकेतिक छायाचित्र)
11 / 11
लंडनमधील ऑर्थोडॉक्स ज्यू समुदायाचे सदस्य एली स्पिट्झर यांनी म्हटले आहे की, काही ज्यू धार्मिक नेत्यांना वाटते, की कायद्याची मदत घेणाऱ्या महिला एक अशी प्रथा सुरू करतील, जी पुन्हा बदलता येणार नाही. पती स्वतःच्या इच्छेनुसार पत्नीला घटस्फोट देण्याच्या स्थितीत राहणार नाहीत. कायद्यातील या सुधारणेने यहुद्यांच्या धार्मिक घटस्फोटाला कमकुवत केले गेले आहे, जो स्वतंत्र इच्छेने दिले जातो. (सांकेतिक छायाचित्र)
टॅग्स :Englandइंग्लंडDivorceघटस्फोट