estimate of 36 thousand deaths due to corona every day after chinese new year in china
Corona Virus : चीनमध्ये कोरोना त्सुनामी, दररोज 36 हजार जणांच्या मृत्यूचा अंदाज; श्रीमंत सोडून जाताहेत देश By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 2:39 PM1 / 13चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान, कोरोनामुळे येथे दररोज 36 हजार मृत्यू होण्याची शक्यता आहे. कारण लोक नववर्ष साजरं करण्यासाठी आपल्या घरी जाणार आहेत. झिरो कोविड पॉलिसी रद्द केल्यानंतर देश सध्या विनाशाच्या मध्यभागी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 2 / 13चीनमध्ये दररोज कोरोनाचे कोट्यवधी रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. चीनने या आठवड्यात कबूल केले आहे की एका महिन्यात 60,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण हे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे चीन मान्य करत नाही. परिस्थिती गंभीर आहे. 3 / 13चीनने 8 जानेवारी रोजी कोरोनामुळे मृतांचा आकडा जाहीर केला, त्यानुसार महामारी सुरू झाल्यापासून केवळ 5,272 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 60 हजार मृत्यूंपेक्षा 10 पट अधिक मृत्यू झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालये भरली आहेत. 4 / 13चीनने केवळ हॉस्पिटलमधील मृत्यूंचा विचार केला आहे. अशा परिस्थितीत घरांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. मात्र याच दरम्यान तज्ज्ञांनी चिनी नववर्षानिमित्त इशारा दिला आहे. ते म्हणतात की लोक मोठ्या संख्येने प्रवास करतील, ज्यामुळे प्रकरणे वाढतील आणि मृत्यूची संख्या देखील जास्त असेल.5 / 13एअरफिनिटी या जागतिक आरोग्य गुप्तचर सेवेचा अंदाज आहे की, 26 जानेवारीपर्यंत दररोज 36,000 मृत्यू होऊ शकतात. विश्लेषकांचा असाही अंदाज आहे की 27 जानेवारीपर्यंत दररोज 6.2 कोटी संक्रमित होऊ शकतात. 6 / 13प्रोफेसर मिन्क्सिन पेई यांनी चीन मृतांची संख्या लपविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल असं म्हटलं आहे. निक्केई आशियाच्या अहवालानुसार, ते म्हणाले, 'झिरो कोविड पॉलिसी हटवण्यात आलेल्या भागात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सरकारला ते लपवण्यासाठी भाग पाडले जात आहे.7 / 13रोज नवनवीन प्रकरणे समोर येत असताना देशातून श्रीमंतांचे पलायन सुरू आहे. चीनमधील श्रीमंत लोक इतर देशांमध्ये जाण्याचा विचार करत आहेत. कारण चीनमधील देशांतर्गत राजकारण गुंतागुंतीचे झाले आहे. 8 / 13परकीय गुंतवणुकीद्वारे आपली संपत्ती बाहेर काढण्याऐवजी नागरिक स्वतःच इतर देशांमध्ये स्थायिक होण्याचे मार्ग शोधत आहेत. श्रीमंत लोक जपान, सिंगापूर आणि काही दक्षिण पूर्व आशियाई देशांना पसंतीचे ठिकाण म्हणून पाहत आहेत. 9 / 13कोरोना महामारीच्या काळात चीन सरकारने त्याच्या खासगी मालमत्तेवर केलेल्या आक्रमणामुळे ते त्रस्त आहेत. चीनमधील लोकांसाठी अमेरिका, कॅनडा आणि युरोपला गुंतवणुकीची पहिली पसंती होती. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळानंतर परिस्थिती बदलली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 13चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. सर्वच शहरं कोरोना संसर्गाच्या विळख्यात येत आहेत. याच दरम्यान, चीनच्या तिसऱ्या सर्वाधिक लोकसंख्येच्या हेनान प्रांतातील 90 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हेनानच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. 11 / 13कोरोनाच्या पहिल्या लाटेत चीनच्या वुहान प्रांतात अशाच प्रकारे कोरोनाने कहर केला होता. जगात कोरोनाचा पहिला रुग्ण वुहानमधूनच आढळून आला होता. सततच्या विरोधानंतर चीनने गेल्या महिन्यात शून्य कोविड धोरण संपुष्टात आणले होते. तेव्हापासून चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. 12 / 13चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक शहरातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेडच शिल्लक नाहीत. औषधांचाही मोठा तुटवडा आहे. बीजिंगसह अनेक प्रांतातून धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. येथील स्मशानभूमीवर मोठी रांग लागली होती. 13 / 13अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागली. हे सर्व असूनही चीनने आपल्या सीमा पूर्णपणे खुल्या केल्या आहेत. एवढेच नाही तर चीनमधून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाईनचे नियमही रद्द करण्यात आले आहेत. चीनवर कोरोनाची आकडेवारी लपवल्याचा आरोपही केला जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications