Fagradalsfjall Volcano erupted after 800 years photos are breath taking
'या' देशात ८०० वर्ष जुन्या ज्वालामुखीचा उद्रेक, फोटोंमधील हाहाकार पाहुन होईल थरकाप By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 6:15 PM1 / 10Fagradalsfjall Volcano या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे फोटो फोटोग्राफर होरुर क्रिस्टलीफसन यांनी ड्रोनच्या मदतीने घेतले आहे. त्यात ज्वालामुखीचे मोठमोठे लोट दिसत आहे.2 / 10आइसलँडची राजधानी रेकजाविकपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या माउंट फॅग्राडॉसफियाकवर हे फोटोज काढण्यात आलेले आहेत. त्यात तप्त लाव्हारस स्पष्टपणे दिसत आहे.3 / 10आइसलँडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर होरुर क्रिस्टलीफसन हे क्रेटरवर ड्रोन उडवत होते. त्यावेळी क्रेटरचा काही भाग खाली ढासळला.4 / 10फोटोत दिसणारा क्रेटर जरी छोटा दिसत असला तरी याची उंची ही 5 मजली इमारतीएवढी आहे.5 / 10फाग्रादाउसफियाक च्या पर्वतावरचा हा ज्वालामुखी 800 वर्षांपासून फुटलेला नव्हता. 6 / 10काही दिवसांपूर्वी आलेल्या भूकंपामुळं हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला असल्याचं बोललं जात आहे.7 / 10समोर आलेल्या फोटोंमधून हा विस्फोट छोटा वाटतो. परंतु या ज्वालामुखीतून निघलेला लाव्हा हा ३२ किलोमीटरपर्यंत पसरला होता.8 / 10त्याच्या उद्रेकामुळं १ हजार ६४० फुट उंचीच्या लाव्हारसाची एक आकृती तयार झाली होती.9 / 10त्याचबरोबर चार दिवसांमध्ये १ कोटी वर्ग फुट लाव्हा बाहेर पडल्याची माहिती समोर येत आहे.10 / 10Iceland या देशातील या ज्वालामुखीचे हे फोटो पाहुन लोकांना जबरदस्त धक्का बसत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications