शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फ्रान्समधील नोट्रे डेम कॅथेड्रेलला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 2:49 PM

1 / 7
पॅरिसमधील 800 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या नोट्रे डेम कॅथेड्रेलला काल संध्याकाळी भीषण आग लागली.
2 / 7
युनेस्कोनं या कॅथेड्रेलला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. सोमवारी कॅथेड्रेलला लागलेली आग मंगळवारी नियंत्रणात आली.
3 / 7
वास्तूकलेचा उत्तम नमुना असलेल्या कॅथेड्रेलला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे 500 कर्मचारी अथक प्रयत्न करत होते.
4 / 7
कॅथेड्रेलमधील असलेल्या अमूल्य वस्तू वाचवण्यातही यश आलं.
5 / 7
कॅथेड्रेलची आग आटोक्यात आणल्यावर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अग्निशमन दलाचं कौतुक केलं. या आगीत झालेल्या नुकसानाबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलं.
6 / 7
या आगीमुळे कॅथेड्रेलच्या गोथिक घुमटाचं आणि छताचं मोठं नुकसान झालं.
7 / 7
नोट्रे डेम कॅथेड्रेलच्या उभारणीला 1163 साली सुरुवात झाली. 1345 मध्ये कॅथेड्रेलचं काम पूर्ण झालं.
टॅग्स :Franceफ्रान्सParisपॅरिसfireआग