शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सेर्को मशीनद्वारे पहिले इच्छामरण; अमेरिकेहून आलेल्या महिलेने स्वित्झर्लंडमध्ये मृत्यूला कवटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 12:44 PM

1 / 9
स्वित्झर्लंडमध्ये ६४ वर्षांच्या एका महिलेने सर्को इच्छामरण मशीनद्वारे मृत्यूला कवटाळले आहे. या वादग्रस्त मशीनचा वापर करणारी ही महिला पहिली व्यक्ती आहे, असे सांगितले जात आहे.
2 / 9
अमेरिकेच्या या ६४ वर्षीय महिलेने यासाठी स्वित्झर्लंड गाठले होते. जर्मनीच्या सीमेवरील जंगलात स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४.०१ वाजता तिने मृत्यूला कवटाळले. या प्रकरणाची माहिती होताच स्विस अधिकाऱ्यांनी अनेक लोकांना ताब्यात घेतले आहे.
3 / 9
आयुष्य संपविण्यासाठी बनविण्यात आलेला हा सर्के पॉडचे हे नाव हा सर्कोफॅगस या इंग्रजी शब्दावरून आले आहे. त्याला संक्षिप्तमध्ये सर्को असे म्हटले जाते. सर्कोफॅगस म्हणजे दगडी शवपेटी, याचा वापर इजिप्त, ग्रीस आणि रोमच्या प्राचीन लोकांनी मृतदेह दफन करण्यासाठी केला होता. याला पेगासस असेही म्हणतात.
4 / 9
हे कॅप्सूल विमानतळावरील कॅप्सूलपेक्षा आरामदायी दिसते. हे थ्रीडी प्रिंटर वापरून बनविलेले आहे. यात लिक्विड नायट्रोजनचा डबा ठेवलेला असतो. त्यातून निघणारा वायू हळूहळू माणसाला संपवितो. ही कॅप्सूल 2019 मध्ये पहिल्यांदा दाखविण्यात आली होती. डॉक्टरांच्या देखरेखीखाली या गोष्टी केल्या जातात. पहिल्यांदाच या कॅप्सूलचा वापर करण्यात आला आहे.
5 / 9
ही मशीन चालू केल्यास ऑक्सिजन कमी होतो आणि नायट्रोजन वाढू लागतो. यामुळे आतील व्यक्तीला श्वास घेता येत नाही व त्याची प्राणज्योत मालवते. मृत्यूची इच्छा असलेल्या व्यक्तीचे प्रथम मनोवैज्ञानिक तपासणी केली जाते.
6 / 9
झाकण लावल्यानंतर जेव्हा बटन दाबले जाते तेव्हा पॉमध्ये काही प्रश्नांची उत्तरे विचारली जातात, त्यांचे उत्तर दिल्यावर इच्छामरणाची प्रक्रिया सुरु होते.
7 / 9
जर ही प्रक्रिया सुरु असताना जगायची इच्छा झाल्यास आतमध्ये इमर्जन्सी बटण देण्यात आलेले आहे. ते दाबून आतील व्यक्ती बाहेर येऊ शकतो.
8 / 9
नायट्रोजन भरू लागल्यावर व्यक्ती बेशुद्ध पडते, व पुढच्या १० मिनिटांत त्या व्यक्तीची प्राणज्योत मालवते. स्वित्झर्लंडमध्ये 1940 च्या दशकापासून इच्छामरणाला परवानगी आहे.
9 / 9
द गार्डियनच्या वृत्तानुसार, जर्मन शास्त्रज्ञ आणि एक्झिट इंटरनॅशनलशी निगडित लास्ट रिसॉर्ट या संस्थेचे प्रमुख सदस्य फ्लोरियन विलेट हे महिलेच्या मृत्यूचे एकमेव साक्षीदार आहेत.
टॅग्स :Switzerlandस्वित्झर्लंडAmericaअमेरिका