Flowers in the Desert Dubai's Fabulous 'Miracle Garden'
दुबईच्या वाळवंटात फुललं ‘मिरॅकल गार्डन’, सौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 4:21 PM1 / 7दुबईच्या वाळवंटात एक असं गार्डन आहे ते पाहताच तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. वाळवंटात सुंदर फुलांनी फुललेलं, हिरवाईने नटलेलं गार्डन म्हणजे ‘मिरॅकल गार्डन’2 / 7मिरॅकल गार्डनमधील फुलांपासून बनविण्यात आलेल्या निरनिराळ्या रचना, सुंदर कलाकुसर आणि जोडीला नैसर्गिक रंगांची मुक्त उधळण असलेल्या या गार्डनचं सौंदर्य पर्यटकांना भूरळ पाडतं.3 / 7दुबईस्थित ‘आकार लँड स्केपिंग सर्विसेस अँड अॅग्रीकल्चर’ या कंपनीने ‘मिरॅकल गार्डन’ची ही अद्भुत संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.4 / 7साधारणपणे ऑक्टोबरच्या सुमारास ‘मिरॅकल गार्डन’ हे पर्यटकांसाठी उघडण्यात येतं. त्यानंतर हे गार्डन मे महिन्यापर्यंत चालू राहतं.5 / 7७२ हजार चौ. मीटर आकाराच्या गोलाकार जागेत ही बाग फुलवलेली असून जगातील हे सर्वात मोठं फुलाचं गार्डन आहे.6 / 7रस्त्याच्या दुतर्फा असलेली मनमोहक फुलं, सात कमानी, सात चांदण्या, पिसारा फुलवलेले मोर, लहान मोठी फुलांची घरे, पिरॅमिडच्या आकारात फुललेली विविध प्रजातीची फुले अत्यंत मोहक आहेत. 7 / 7सर्वात जास्त लांबीची फुलांची भिंत हे मिरॅकल गार्डनचे वैशिष्ट्य असून या गार्डनची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications