PHOTOS : खंबीर राहा...! इम्रान खान यांना अटक अन् पाकिस्तानी खेळाडू 'मैदानात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 22:04 IST
1 / 10 पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्याने शेजारील देशात तणावाचे वातावरण आहे. खान यांच्या पीटीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करून निषेध व्यक्त केला. 2 / 10इम्रान खान यांच्या अटकेवरून त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असतानाच आपल्या कर्णधाराच्या समर्थनार्थ पाकिस्तानी खेळाडू देखील मैदानात उतरल्याचे दिसते. वसिम अक्रम, शाहीन आफ्रिदी यांनी इम्रान खान यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे.3 / 10इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर इम्रान खान यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. 4 / 10इस्लामाबाद उच्च न्यायालयाने खान यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवल्याने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. या यादीत माजी क्रिकेटपटू वसिम अक्रम व्यतिरिक्त विद्यमान वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा समावेश आहे. 5 / 10पाकिस्तानी संघाचा दिग्गज वसिम अक्रमने आपल्या कर्णधाराचा बचाव केला. बचावासाठी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले, 'इम्रान तू एक माणूस आहेस, पण करोडो लोक तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.' 6 / 10वसीम अक्रमने #BehindYouSkipper हा हॅशटॅग वापरून आपला इरादा स्पष्ट केला. त्याचवेळी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने इम्रान खान यांच्या समर्थनार्थ आपला ट्विटर डीपी बदलून निषेध नोंदवला.7 / 10भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला एकदा वन डे विश्वचषक जिंकण्यात यश आले. इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने १९९२ च्या विश्वचषकावर कब्जा केला होता.8 / 10इम्रान यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीत कौशल्य दाखवून आपल्या देशाला जग्गजेते बनवले होते. त्यांनी १९९२च्या विश्वचषकात १८५ धावा केल्या होत्या, तर ७ बळी घेतले होते.9 / 10पाकिस्तानने अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून किताब पटकावला होता. 10 / 10क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर इम्रान यांनी राजकीय खेळी सुरू केली. ते पाकिस्तानचे पंतप्रधान देखील झाले, पण आता ते तुरुंगात आहेत.