Four times bigger Asteroid than qutubminar will fly by earth in next two days
पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय कुतुब मीनारपेक्षाही 4 पटीने मोठा उल्कापिंड, केवळ दोन दिवस... By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:47 PM1 / 9नासाचे वैज्ञानिक अशा सर्वात लघुग्रहांना धोका मानतात जे पृथ्वीपासून 75 लाख किमोमीटरच्या अंतराहून जातात. या वेगाने जाणाऱ्या खगोलीय उल्कापिंडाना नीअर अर्थ ऑबजेक्टस असे म्हटले जाते.2 / 9या लघुग्रहाचं नाव आहे 2010एनवाय65. हा लघुग्रह 1017 फूट लांब आहे म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा साधारण तीन पटीने आणि कुतूब मीनारपेक्षा चार पटीने मोठा आहे. 3 / 9हा लघुग्रह 46, 400 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हा लघुग्रह 24 जूनला दुपारी 12.15 वाजता पृथ्वीच्या जवळून जाईल. (प्रातिनिधीक छायाचित्र)4 / 9अमेरिकेतील एजन्सी नासाचा अंदाज आहे की, हा लघुग्रह पृथ्वीपासून साधरण 37 लाख किलोमीटर दूरून जाईल.5 / 9नासाचे वैज्ञानिक अशा सर्वात लघुग्रहांना धोका मानतात जे पृथ्वीपासून 75 लाख किमोमीटरच्या अंतराहून जातात. या वेगाने जाणाऱ्या खगोलीय उल्कापिंडाना नीअर अर्थ ऑबजेक्टस असे म्हटले जाते.6 / 9सूर्याच्या चारही बाजूने फिरणारे हे छोटे छोटे लघुग्रह अनेकदा पृथ्वी जवळून जातात. अनेकदा या ग्रहांमुळे पृथ्वीचं नुकसानही होतं.7 / 9जूनमध्ये लघुग्रह पृथ्वी जवळून जाण्याची ही तीसरी घटना आहे. याआधी 6 जून रोजी एक लघुग्रह पृथ्वी जवळून गेला होता. हा लघुग्रह 570 मीटर व्यासाचा होता. हा लघुग्रह पृथ्वीपासून 40, 140 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गेला होता. याचं नाव 2002एनएन4 होतं.8 / 9त्यानंतर 8 जून रोज एक लघुग्रह 2013एक्स22 पृथ्वी जवळून गेला होता. याची वेग 24,050 किलोमीटर प्रति तास इतका होता. हा पृथ्वीपासून साधारण 30 लाख किलोमीटर दुरून गेला होता.9 / 9दरम्यान, 2013 मध्ये चेल्याबिंस्क लघुग्रह रशियात पडला होता. यामुळे 1 हजारांपेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. हजारो घरांच्या खिडक्या आणि दरवाजे तुटले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications