शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नशीबच! 18व्या मजल्यावरून पडला 4 वर्षांचा चिमुकला; पण, "देव तारी त्याला कोण मारी!"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 3:37 PM

1 / 10
आपल्याकडे एक म्हण आहे, 'देव तारी त्याला कोण मारी?' किंवा 'जाको राखे साइयां, मार सके न कोय...' याचाच अर्थ ज्याचं रक्षण स्वतः देवच करतो, त्याला कुणीही मारू शकत नाही. काहीसे असे एका चारवर्षांच्या चिमुकल्यासोबत घतले आहे. (सांकेतिक फोटो)
2 / 10
हा चिमुकला एक-दोन नव्हे, तर तब्बल 18व्या मल्यावर असलेल्या आपल्या फ्लॅटच्या खिडकीतून खाली पडला. मात्र तरीही तो बचावला आहे. (सांकेतिक फोटो)
3 / 10
चीनच्या हुबेई प्रांतातील शियांगयांग शहरात एक चार वर्षांचा चिमुकला आपल्या घरी एकटाच होता. त्याचे आई-वडील बाहेर असतात. हा मुलगा सोफ्यावर चढला आणि लागूनच असलेल्या एका खिडकीतून तब्बल 180 फूट खाली पडला. ही घटना 6 ऑगस्टला घडली. (सांकेतिक फोटो)
4 / 10
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी सांगितले, की हा चिमुकला खाली असलेल्या एका झाडावर पडल्याने बचावला. मात्र, गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्याची प्रकृती स्थिर आहे. (सांकेतिक फोटो)
5 / 10
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी सांगितले, की हा चिमुकला खाली असलेल्या एका झाडावर पडल्याने बचावला. मात्र, गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्याची प्रकृती स्थिर आहे. (सांकेतिक फोटो)
6 / 10
जखमी झालेला हा चिमुकला घरी आपल्या आजीसोबत राहात होता. कारण त्याचे आई-वडील दुसऱ्या शहरतात नोकरी करतात. (सांकेतिक फोटो)
7 / 10
हा चिमुकला एकटाच खेळत असताना खिडकीतून खाली पडला. यावेळी त्याची आजी घरातील रेशन आणण्यासाठी बाहेर गेली होती. (सांकेतिक फोटो)
8 / 10
चिमुकल्याच्या आई-वडिलांना इमर्जंसी सर्व्हिसने फोन करण्यात आला. चिमुकल्याच्या वडिलांनी सांगितले, की माझ्या आईला या घटनेचा धक्का बसला होता. तिला काहीच सुचत नव्हते. मात्र काही अनोळखी लोकांनी मुलाला रुग्णवाहिकेने रुग्णालयात पोहोचवले. (सांकेतिक फोटो)
9 / 10
रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या चिमुकल्याला अनेक ठिकाणी दुखापत झाली आहे. मुलाला आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. मात्र, त्याची प्रकृती स्थिर आहे. यासंदर्भात बोलताना, चिमुकल्यावर उपचार करणारे डॉक्टर चेन शी म्हणाले, की हे एखाद्या चमतकारापेक्षा कमी नाही. (सांकेतिक फोटो)
10 / 10
घटनेनंतर मुलासाठी तत्काळ इमर्जंसी प्रोटोकॉल तयार करण्यात आला. मुलाची सर्जरी करण्यासाठी 6 वेगवेगळ्या विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरदेखील उपस्थित होते. सर्जरीनंतर तीन दिवसांनी या चिमुकल्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागला.
टॅग्स :chinaचीनhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर