France hands over first Rafale jet, Rajnath performs ‘Shastra Puja’
दसऱ्याच्या मुहूर्तावर हवाईदलात राफेल; संरक्षणमंत्र्यांनी केले पूजन By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 6:21 AM1 / 16मेरिग्नॅक (फ्रान्स) : भारतीय हवाईदलाने मंगळवारी पहिले राफेल लढावू विमान औपचारिकरीत्या स्वीकारले. अशी ३६ राफेल विमाने फ्रान्सकडून भारताने विकत घेतली आहेत. 2 / 16राफेल विमान भारताला सुपूर्द करण्याचा कार्यक्रम नैर्ऋत्य फ्रान्समध्ये मेरिग्नॅक येथील दसॉल्ट एव्हिएशन फॅसिलिटी येथे झाला तेव्हा संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले उपस्थित होते. 3 / 16दसॉल्ट एव्हिएशनने राफेल विमानांचे उत्पादन केले आहे.4 / 16राजनाथ सिंह यांच्या हस्ते राफेल विमानाची छोटीशी शस्त्र पूजा केली गेली. 5 / 16या विमानातून राजनाथ सिंह यांनी उड्डाण केले त्या आधी त्यांनी विमानावर कुंकवाने ‘ओम’ लिहून फुले वाहिली आणि नारळ ठेवले.6 / 16या कार्यक्रमास भारतीय सशस्त्र दलांतील वरिष्ठ प्रतिनिधी हजर होते.7 / 16‘जगात आमचे हवाई दल सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाचे आहे आणि राफेल विमानांमुळे ते आधीपेक्षाही जास्त बळकट होईल आणि त्या भागात शांतता आणि सुरक्षा खात्रीने राहील असा माझा विश्वास आहे, असे सिंह म्हणाले.8 / 16राफेल या शब्दाचा हिंदीतील अर्थ वादळ किंवा वाऱ्याचा झंझावात असल्याचे मला सांगण्यात आले असून, मला खात्री आहे की हे विमान त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करील, असे ते म्हणाले.9 / 16हवाईदल प्रमुख राकेश भदुरिया हे भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख असताना राफेल विमानांच्या खरेदीचा करार झाला होता व त्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.10 / 16भारत-फ्रान्स यांच्यातील व्यूहरचनात्मक भागीदारीत आजचा दिवस हा मैलाचा दगड असून, उभय देशांतील संरक्षण सहकार्यात नवी उंची त्याने गाठली असल्याचे सिंह म्हणाले.11 / 16असे यश आम्हाला नवीन काही तरी करायला प्रोत्साहन देते, असे सिंह यांनी वार्षिक भारत-फ्रान्स संरक्षण चर्चेच्या संदर्भाने सांगितले. 12 / 16सप्टेंबर २०१६ मध्ये ३६ राफेल विमान खरेदीचा ५९ हजार कोटी रुपयांचा करार झाला होता.13 / 16सप्टेंबर २०१६ मध्ये ३६ राफेल विमान खरेदीचा ५९ हजार कोटी रुपयांचा करार झाला होता.14 / 16सप्टेंबर २०१६ मध्ये ३६ राफेल विमान खरेदीचा ५९ हजार कोटी रुपयांचा करार झाला होता.15 / 16सप्टेंबर २०१६ मध्ये ३६ राफेल विमान खरेदीचा ५९ हजार कोटी रुपयांचा करार झाला होता.16 / 16सप्टेंबर २०१६ मध्ये ३६ राफेल विमान खरेदीचा ५९ हजार कोटी रुपयांचा करार झाला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications