शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रेपिस्ट पतीची हत्या करून मुलांसोबत मृतदेहाची लावली होती विल्हेवाट, तरी महिलेची कोर्टाने शिक्षा केली माफ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 10:58 AM

1 / 11
नुकताच फ्रान्समध्ये एका महिलेसंबंधीचा निर्णय चांगलाच चर्चेत आला आहे. वॅलेरी बेकोट नावाच्या या महिलेने आपल्या रेपिस्ट पतीची हत्या केली होती. ज्यानंतर तिच्यावर शिक्षा होण्याची टांगती तलवार होती. मात्र, कोर्टाने या केसची परिस्थिती बघता वॅलेरीला शिक्षा न देता सोडून देण्याचा आदेश दिला होता. या निर्णयाचं लोकांनी स्वागत केलं आहे.
2 / 11
वॅलेरी बेकोटला बालपणापासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. तिचे आई-वडील १९९२ मध्येच वेगळे झाले होते. वॅलेरीच्या आईला दारूची सवय होती आणि ती फार हिंसकही होती.
3 / 11
वॅलेरीला जेव्हा समजलं की, डेनिअल आता त्यांच्या मुलीला देहविक्रीच्या व्यवसायात उतरवणार आहे. तेव्हा तिने त्याला मारण्याचा निर्णय घेतला.
4 / 11
डेनिअल डिसेंबर १९९२ मध्ये वॅलेरी आणि तिच्या आईसोबत राहू लागला होता. डेनिअल किती विचित्र आहे हे तेव्हा समोर आलं जेव्हा त्याने १२ वर्षीय वॅलेरीवर रेप केला होता. त्यानंतर त्याला १९९६ मध्ये चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर तो पुन्हा एकदा वॅलेरीच्या घरी आला होता आणि त्याने पुन्हा एकदा वॅलेरीसोबत जबरदस्ती केली होती.
5 / 11
वॅलेरी १७ वर्षांची असतानाच गर्भवती झाली होती आणि तिच्या आईने तिला घरातून बाहेर काढलं होतं. त्यानंतर डेनिअलने वॅलेरीसोबत लग्न केलं होतं. वॅलेरी आणि डेनिअलला चार मुलं आहेत. डेनिअल आणि वॅलेरीचं लग्न १८ वर्षे चाललं. त्यानंतर २०१६ मध्ये वॅलेरीने आपल्या पतीवर गोळी झाडून त्याची हत्या केली होती.
6 / 11
वॅलेरीला २५ जून २०२१ ला चार वर्षांची शिक्षा मिळाली होती. पण जनतेच्या जबरदस्त विरोधानंतर तिची तीन वर्षांची शिक्षा रद्द करण्यात आली. ती आधीही प्री-ट्रायल डिटेंशन सेंटरमध्ये राहिली आहे. त्यामुळे ती आता घरी जाण्यासाठी स्वतंत्र आहे. तिला सोडण्यात यावं यासाठी ७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पीटिशन साइन केली होती.
7 / 11
१३ मार्च २०१६ ला वॅलेरीवर एका क्लाएंटने रेप केला होता. त्याच दिवशी वॅलेरीने आपल्या पतीच्या डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या केली होती. ही पिस्तुल डेनिअलने कारमध्ये लपवली होती. यानंतर वॅलेरीने तिचे दोन मुले आणि मुलीच्या बॉयफ्रेन्डच्या मदतीने आपल्या पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.
8 / 11
वॅलेरीने कोर्टात सांगितलं होतं की, तिला तिच्या पतीला मारण्याची प्रेरणा यावरून मिळाली, कारण ती या व्यक्तीच्या हिसेंची गेल्या २५ वर्षापासून शिकार होती.
9 / 11
वॅलेरीला जेव्हा समजलं की, डेनिअल आता त्यांच्या मुलीला देहविक्रीच्या व्यवसायात उतरवणार आहे. तेव्हा तिने त्याला मारण्याचा निर्णय घेतला.
10 / 11
१३ मार्च २०१६ ला वॅलेरीवर एका क्लाएंटने रेप केला होता. त्याच दिवशी वॅलेरीने आपल्या पतीच्या डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या केली होती. ही पिस्तुल डेनिअलने कारमध्ये लपवली होती. यानंतर वॅलेरीने तिचे दोन मुले आणि मुलीच्या बॉयफ्रेन्डच्या मदतीने आपल्या पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.
11 / 11
वॅलेरीला २५ जून २०२१ ला चार वर्षांची शिक्षा मिळाली होती. पण जनतेच्या जबरदस्त विरोधानंतर तिची तीन वर्षांची शिक्षा रद्द करण्यात आली. ती आधीही प्री-ट्रायल डिटेंशन सेंटरमध्ये राहिली आहे. त्यामुळे ती आता घरी जाण्यासाठी स्वतंत्र आहे. तिला सोडण्यात यावं यासाठी ७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पीटिशन साइन केली होती.
टॅग्स :Franceफ्रान्सCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ