शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ब्रिटनची पुढची महाराणी बनणार कॅमिला, 'सावत्र आई' ते 'लग्न तोडणारी महिला' असे होतात तिच्यावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 2:52 PM

1 / 10
ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीयने नुकतीच घोषणा केली की, त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स राजा बनल्यानंतर त्यांची सून कॅमिला महाराणी बनेल. यानंतर ब्रिटनच्या मीडियापासून ते सामान्य लोकांमध्ये कॅमिलाबाबत चर्चा होत आहे. ब्रिटनची पुढची महाराणी कॅमिलाला लोक अजिबात पसंत करत नाहीत. ती सध्या 'डचेस ऑफ कॉर्नवाल' आहे. अनेक लोकांनी इतकंही सांगितलं की, ते कॅमिलाला महाराणी म्हणून स्वीकारणार नाही.
2 / 10
सोशल मीडियावर लोक एलिजाबेथ द्वितीयच्या वक्तव्यावर नाराज दिसले आणि सर्वांनी प्रिन्सेस डायनाची आठवण काढली. जास्तीत जास्त लोक कॅमिलाच्या विरोधात दिसत आहेत. नुकताच महाराणीने त्यांच्या राणी होण्याला ७० वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला. त्यांच्या वक्तव्यानुसार, कॅमिलाला भविष्यात क्वीन कंसोर्टच्या रूपात मानलं जाईल.
3 / 10
कॅमिलाचं जीवन वादग्रस्त होतं. तिच्यावर प्रिन्स चार्ल्सची दिवंगत पत्नी प्रिन्सेस डायनासोबतचं प्रिन्स चार्ल्सचं लग्न तोडल्याचा आरोप लागतो. असं म्हटलं जातं की, ती त्यांच्या दोघांच्या संसारात आली. ज्यामुळे चार्ल्स आणि प्रिन्सेस डायनाला घटस्फोट घ्यावा लागला. नंतर प्रिन्सेस डायनाचा अपघातात मृत्यू झाला.
4 / 10
कॅमिलावर लोक आरोप लावतात की, तिनेच शाही लग्न तोडलं. जे एखाद्या परीच्या कहाणीपेक्षा कमी नाही. इतकंच काय तर डायनानेही बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत अनेक हैराण करणारे दावे केले होते. ती म्हणाली होती की, 'या लग्नात आम्ही तीन लोक आहोत'. चार्ल्स आणि कॅमिला एकमेकांवर प्रेम करत होते.
5 / 10
तेही चार्ल्स आणि डायना यांचं लग्न झाल्यावर. अपघातात मृत्यू झाल्यानंतर चार्ल्स आणि कॅमिला आपलं प्रेम जगासमोर आणण्यासाठी स्वतंत्र होते. चार्ल्स आणि कॅमिलाने २००५ मध्ये लग्न केलं. संवेदनशीलता लक्षात घेता कॅमिलाला डचेस ऑफ कॉर्नवाल पदवी देण्यात आली.
6 / 10
कॅमिलाने लोकांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी टीव्ही शोजमध्ये भाग घेताल. आरोग्य अभियान चालवली. अनेक प्रयत्न करूनही ती वादातच होती. कॅमिलाचा जन्म लंडनमधील श्रीमंत घरात झाला होता. तिने स्वित्झर्लॅंड आणि फ्रान्समध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर लंडनमध्येही उच्च शिक्षण घेतलं.
7 / 10
१९७० मध्ये एका पोलो मॅच दरम्यान पहिल्यांदा प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिलाची भेट झाली. नंतर दोघे जवळ आले. असं सांगितलं जातं की चार्ल्सने कधी कॅमिलाला प्रपोज केलं नाही. कॅमिलाने १९७३ मध्ये ब्रिटिश सेना अधिकारी एंड्रयू पार्करसोबत लग्न केलं. या लग्नात महाराणीची बहीण राजकुमार मार्गारेट आणि त्यांची मुलगी राजकुमारी ऐनी आल्या होत्या. कॅमिला आणि एंड्र्यूला दोन मुलं आहेत.
8 / 10
यानंतर कॅमिला आणि चार्ल्स एकमेकांच्या फार जवळ आले. प्रिन्स चार्ल्सने १९८१ मध्ये प्रिन्सेस ऑफ वेल्स डायनासोबत लग्न केलं. कॅमिलाने एंड्रूयूला १९९५ मध्ये घटस्फोट दिला. याच्या एका वर्षाने १९९६ मध्ये चार्ल्स आणि डायनाचा घटस्फोट झाला.
9 / 10
आता प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला लग्न न करता पती-पत्नीसारखे राहू लागले होते. बराच विचार केल्यावर दोघांनी २००५ मध्ये लग्न केलं. कॅमिलाला कुत्रे आणि घोड्यांची फार आवड आहे. काळानुसार सगळं काही सामान्य झालं आणि शाही परिवाराने तिला स्वीकारलं.
10 / 10
इतकंच काय तर चार्ल्स आणि डायनाची मुलं हॅरी आणि विलियम यांनीही तिला स्वीकारलं. हॅरी म्हणाला होता की, ती फार चांगली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी आमच्या वडिलांना खूप आनंद दिला आहे. मी आणि विलियम त्यांच्यावर प्रेम करतो.
टॅग्स :LondonलंडनInternationalआंतरराष्ट्रीय