game changer Britain! Saved the corona patient who on ventilator; Steroid test successful
ब्रिटन गेमचेंजर ठरणार! मृत्यूच्या दाढेतील कोरोनाबाधितांना वाचविले; स्टेरॉईडची चाचणी यशस्वी By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 5:03 PM1 / 10कोरोना व्हायरसच्या लढाईमध्ये आता ब्रिटनहून एक दिलासा देणारी बातमी आली आहे. डेक्सामेथासोन स्टेरॉईडच्या मोठ्या क्लिनिकल ट्रायलचा अखेरचा रिपोर्ट समोर आला आहे. शुक्रवारी जारी झालेल्या या रिपोर्टनुसार या औषधामुळे कोरोना संक्रमितांच्या प्रकृतीमध्ये मोठी सुधारणा झाल्याचे म्हटले आहे. 2 / 10'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन' मध्ये हा अहवाल शुक्रवारी छापण्यात आला. यानुसार मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या कोरोना रुग्णांवर या औषधाचा मोठा परिणाम दिसून आला आहे. व्हेंटिलेटरवर असलेल्या कोविड-19 रुग्णांची हालत सुधारली आहे. यासाठी या औषधाने मोठी मदत केली आहे. 3 / 10मात्र, पहिल्या टप्प्यात हे औषध कोरोना रुग्णांना न देण्याचेही यामध्ये सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात हे औषध रुग्णांना दिल्यास त्याचा उलटा परिणार होणार असून रुग्णांच्या जिवाला धोका असल्याचा यामध्ये इशारा देण्यात आला आहे.4 / 10या औषधाच्या चाचणीसाठी एकूण 2104 कोरोना रुग्णांना निवडण्यात आले होते. त्यांना जवळपास 10 दिवस रोज 6 एमजीचा डोस देण्यात येत होता. तर 4,321 रुग्णांना सामान्य केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले होते. चार आठवड्यांनी म्हणजेच 28 दिवसांनी त्याच्यातील मृत्यूदर कमालीचा कमी झाला होता. 5 / 1028 दिवसांनंतर संशोधकांना असे दिसून आले की, व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोना बाधितांना डेक्सामेथासोनने वाचविले आहे. त्याच्या मृत्यूचा धोका 36 टक्क्यांनी कमी झाला आहे. तर मेकॅनिल व्हेंटिलेशनशिवाय प्राणवायू घेण्याची ताकद असलेल्या रुग्णांमध्ये 18 टक्के धोका कमी झाला आहे. 6 / 10व्हेंटिलेटरवर असलेल्या ज्या रुग्णांना डेक्सामेथासोन देण्यात आली त्यांच्या मृत्यूचा धोका 29.3 टक्के होता. तर या औषधाविना व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका हा 41.1 टक्के होता. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनशिवाय उपचार घेत असलेल्या रुग्णांवर याच्या उलट परिणाम दिसून आले.7 / 10व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनशिवाय उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही डेक्सामेथासोन देण्यात आले. त्यांच्यातील मृत्यूचा धोका हा 17.8 टक्के होता. तर औषध न दिलेल्या या कॅटॅगरीच्या रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका हा 14 टक्के होता. 8 / 10या अभ्यासानुसार व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनशिवाय उपचार घेत असलेल्या रुग्णांवर या औषधाचा फारसा फरक पडलेला नाही. 'यूएस नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इंफेक्शन'चे डॉ. एच. क्लिफोर्ड लेन आणि डॉ. अँथोनी फॉसी यांनी सांगितले की, या संशोधनाचे निकाल हे एका चांगल्या आणि मोठ्या चाचणीच्या महत्वाला अधोरेखित करतात. 9 / 10दुसरीकडे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील लसीची मानवी चाचणी सुरु आहे. या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. या टप्प्यात ही लस कोरोनाग्रस्तांच्या शरीरामध्ये अँटीबॉडी आणि टी बॉडीज सेल्स बनविण्यात यशस्वी ठरली आहे.10 / 10ऑक्सफोर्ड विद्यापीठाने एप्रिलमध्येच कोरोनाच्या लसीची चाचणी सुरु केली होती. तेव्हा 500 कोरोना रुग्णांवर चाचणी करण्यात आली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications