शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रत्ने, सोने, चांदी! ३६० वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजात सापडला अमाप खजिना, पाहून शोधणारेही अवाक...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 12:04 AM

1 / 7
८९१ टन वजनाचं एक स्पॅनिश जहाज ४ जानेवारी १६५६ रोजी बुडालं होतं. या जहाजामध्ये काही अनमोल वस्तू असल्याचा दावा करण्यात येत होता. जहाजात ३५ लाखांहून अधिक खजिन्याच्या वस्तू होत्या. दरम्यान एलन एक्सप्लोरेशनने एका अभियानामधून या समुद्रातून यापैकी काही अनमोल वस्तूंचा शोध घेतला आहे.
2 / 7
खजिन्याचा शोध घेणाऱ्या लोकांनी दावा केला की, अजून अनेक वस्तू समुद्र तळाला असू शकतात. जहाजाला बुडून ३६० वर्षे उलटल्याने खजिना शोधणे खूप आव्हानात्मक बनले आहे. सुमारे ८९१ टन वजनाच्या या जहाजावर ते दुर्घटनाग्रस्त झाले तेव्हा ६५० प्रवाशी होते. त्यांच्यापैकी जेमतेम ४५ प्रवाशीच जिवंत राहिले होते.
3 / 7
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार या जहाजामध्ये खजिन्याचे ३५ लाख पीस होते. त्यामधील केवळ ८ पीसच १६५६ ते १९९० च्या सुरुवाती दरम्यान शोधता आले होते.
4 / 7
एलन एक्सप्लोरेशनचे फाउंडर कार्ल एलन यांनी सांगितले की, त्यांनी आणि त्यांच्या टीमने या मौल्यवान वस्तूंचा एका बेटाजवळ शोध घेण्यास सुरुवात केली. हे बेट बहामासच्या उत्तरेला आहे. त्यासाठी हाय रेझ्युलेशन असलेले मॅग्नोमीटर्स, जीपीएस, मेटल डिटेक्टर वापरण्यात आले.
5 / 7
कार्ल एलन यांनी सांगितले की, या जहाजाचा शोध घेत असताना पन्ना, नीलम आदि रत्ने, तोफ, ३ हजार चांदीची नाणी आणि २५ सोन्याची नाणी सापडली. चायनिज पोर्सलिन तसेच लोखंडाची चेनही सापडली. त्याबरोबरच चांदीचे तलवारीचे हँडल सापडले. तसेच तब्बल ८८७ ग्रॅम वजनाची एक सोन्याची चेनसुद्धा सापडली.
6 / 7
एलन एक्सप्लोरेशनचे संशोधक जिम सिंक्लेयर यांनी सांगितले की, समुद्राच्या तळाला सापडलेल्या या वस्तू तेव्हाचा माणूस कशा प्रकारच्या वस्तू वापरायचा हे हे दाखवतात.
7 / 7
एलन एक्स्प्लोरेशनचे प्रवक्ते बिल स्पिंगर यांनी सांगितले की, त्यांची संस्था कुठलीही वस्तू विकत नाही किंवा त्यांचं लिलाव करत नाही. ज्या वस्तू मिळाल्या आहेत त्या अनमोल आहेत. या सर्व वस्तू प्रदर्शनाचा भाग असतील. तसेच एलन एक्स्पोरेशनच्या बहामास मेरिटाईम म्युझियममध्ये त्या दिसतील.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीhistoryइतिहासInternationalआंतरराष्ट्रीय